राहुड येथील महिलेस जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 05:41 PM2018-12-20T17:41:44+5:302018-12-20T17:41:56+5:30
चांदवड : चांदवड तालुक्यातील राहुड येथील एका महिंलेस तीच्यावर चारित्र्याचा संशय घेत जाळण्याचा प्रयत्न पतीकडून करण्यात आला. यावेळी मध्ये पडलेल्या सासूला देखिल कारहाण करून नंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न सदर महिलेच्या पतीने केला. या प्रकरणी गुन्हा दाखळ करण्यात आला आहे.

रत्ना गुलाब वानखेडे (४०) या महिलेस बुधवारी (दि.१९) तिचा पती गुलाब जिजाबा वानखेडे याने पत्नीवर चरित्र्यावर संशय घेऊन, तिला वाईट शिवीगाळ, धमकी देऊन गजाने मारहाण केली. तिच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून अंगावर डिझेल व रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी तिची आई लिलाबाई गंगाराम देवरे (६५) रा. झोडगे ता. मालेगाव ही सोडविण्यास गेली असता तिला गजाने मारुन डोके फोडले.
त्यानंतर गुलाब वानखेडे याने घरात गळफास घेण्याचा प्रयत्न केला, त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. पत्नी रत्ना हिस चांदवड उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तर गुलाब वानखेडे यास मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला तर मनमाड विभागाच्या पोलीस उपअधिक्षक रागसुधा आर. यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात मार्गदर्शन केले. चांदवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी हे करीत आहेत.