अपूर्ण ड्रीम प्रोजेक्टसाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:24 PM2018-06-14T23:24:48+5:302018-06-14T23:24:48+5:30
नाशिक : तब्बल अडीच वर्षांनंतर होमग्राउण्डवर आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांशी भुजबळ यांनी संवाद साधला. नाशिकपासून दूर राहिल्याची खंत व्यक्त करणाऱ्या भुजबळ यांनी अपूर्ण ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला.
नाशिक : तब्बल अडीच वर्षांनंतर होमग्राउण्डवर आलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांशी भुजबळ यांनी संवाद साधला. नाशिकपासून दूर राहिल्याची खंत व्यक्त करणाऱ्या भुजबळ यांनी अपूर्ण ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला.
सकाळी मुंबईहून नाशिकला निघालेल्या भुजबळांचे मुंबई- आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. शहराच्या प्रवेशद्वारापासून कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.
पाथर्डी फाटा येथे भुजबळ यांनी तेथे असलेल्या शिवाजी महाराज तसेच गणेशवाडी येथील महात्मा जोतिबा फुले, शिवाजीरोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून वंदन केले. राष्टÑवादी भवन येथे जिल्हाभरातील कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी आले होते.छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी महिला कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी फुगड्या खेळून त्यांनी आनंद व्यक्त केला. राष्टÑवादी भवन येथे मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी गंगापूर धरण येथील बोट क्लब, सप्तशृंग गडावरील फ्युनिक्यूलर ट्रॉली, आर्टिस्ट हंट्स या अपूर्ण राहिलेल्या ड्रिम प्रोजेक्टसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. यावेळी भुजबळ यांनी, हे प्रकल्प पूर्ण होऊ नयेत म्हणून काही लोकांनी त्यात अडथळे आणण्यासाठी प्रयत्न केल्याचाही उल्लेख केला. बोटक्लबसाठी विदेशातून काही बोट्स मागविल्या होत्या. यासर्व बोटी प्रदूषणमुक्त होत्या. मात्र आता या प्रकल्पाची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. यातील काही बोट्स कोणीतरी घेऊन गेले आहेत. याविरोधात नाशिककरांनीच आवाज उठवायला हवा होता. मात्र तसे घडले नाही. परंतु आता पुढच्या काळात हे सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. यावेळी भुजबळांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर नाशिककरांची साथ हवी असल्याचीही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ आणि मुलगा आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते. तसेच आमदार नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, शरद अहेर, बाळासाहेब कर्डक, नाना महाले, अंबादास खैरे संजय साबळे, गजानन शेलार, राजेंद्र बागुल, निवृत्ती अरिंगळे, शोभा मगर, भारती पवार, प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, संतोष सोनपसारे, विष्णुपंत म्हैसधुणे, दिलीप बनकर, अॅड. चिन्मय गाढे, नंदन भास्करे, संजय खैरनार आदी उपस्थित होते. भुजबळ शुक्रवारी (दि.१५) येवला या त्यांच्या मतदारसंघात जाणार आहेत. तत्पूर्वी ते जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन येवलावासीयांच्या समस्यांबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.
—-विमानसेवेबद्दल समाधान
ओझर विमानतळावरून उद्यापासून नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू होत असल्याचे समाधान आहे. वास्तविक ही सेवा अगोदरच सुरू व्हायला हवी होती. दिल्ली-नाशिक विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळेल. पुढच्या काळात, नाशिक-बंगळुरू, नाशिक-सुरत, नाशिक अहमदाबाद या सेवाही सुरू व्हायला हव्यात. अधिक फ्लाइट्स कशा सुरू होतील याचा विचार व्हायला हवा, असेही भुजबळ म्हणाले. ..बोलाविले तर जाईल
सप्तशृंग गडावर देशातील पहिली फ्यूनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याचे उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते व्हावे, अशी स्थानिकांची इच्छा आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनीच उद्घाटन करून ही सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. जर त्यांनी मला बोलाविले तर त्यासाठी मी नक्की जाईल, असेही भुजबळ म्हणाले.
भुजबळ-चुंबळे भेट
नाशिकमध्ये भुजबळ यांनी पूर्वाश्रमीचे राष्टÑवादीचे नेते अन् आता शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवाजी चुंबळे यांच्या भेट घेतली. यावेळी चुंबळे काहीसे भावुक झाल्याचे दिसून आले. दोघांनीही गळाभेट घेऊन एकमेकांशी संवाद साधला.