जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:39 AM2018-12-22T01:39:44+5:302018-12-22T01:40:04+5:30

नाशिक : राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दोनशे रुपये प्रति-क्विंटल अनुदान देण्याचा निर्णयाचा शेतकºयांनी विरोध दर्शविला असून, त्याचाच भाग म्हणून ...

Trying to visit the onion to the district collectors | जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट देण्याचा प्रयत्न

जिल्हाधिकाऱ्यांना कांदा भेट देण्याचा प्रयत्न

Next

नाशिक : राज्य सरकारने कांदा उत्पादकांना दोनशे रुपये प्रति-क्विंटल अनुदान देण्याचा निर्णयाचा शेतकºयांनी विरोध दर्शविला असून, त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांना कांद्याच्या गोण्या भेट देण्याचा प्रयत्न केला. कांद्याच्या गोण्यासोबत घेऊन आलेल्या शेतकºयांचा डाव ओळखून जिल्हाधिकाºयांचे स्वीय सहायक व सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून कांद्याच्या गोण्या ताब्यात घेतल्या.  जिल्ह्यात कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या विरोधात गावोगावी कांदा उत्पादक शेतकºयांचे आंदोलने होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांदा विक्रीचे पैसे मनिआॅर्डरने पाठवून आपला संताप व्यक्त करू लागले आहेत. अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी, सदरचे अनुदान तुटपुंजे असल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी दुपारी महाराष्टÑ राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना कांद्याच्या दोन छोट्या गोण्या भेट देऊन शासनाचा निषेध नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कांद्याच्या गोण्या घेऊन आलेल्या शेतकºयांना सुरक्षारक्षकांनी अडवून कांद्याच्या गोण्या ताब्यात घेतल्या व त्यानंतर शिष्टमंडळाला जिल्हाधिकाºयांच्या भेटीसाठी पाठविले. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, शासनाने जाहीर केलेली दोनशे रुपये अनुदानाची रक्कम खूप तुटपुंजी असून, राज्य व केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकºयांचे आर्थिक नुकसान भरून निघण्यासाठी किमान सातशे रुपये प्रति क्विंटल अनुदान सरसकट द्यावे. तसेच नवीन कांदाही अल्पदरात विक्री होत असल्याने त्यासाठी दोन हजार रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी केली. याशिष्टमंडळात अशोक बोडके, सुरेश गिते, खंडेराव दिघोळे, सोमनाथ गिते, नाना काकड, जयराम गामणे, पुंडलीक बर्के, सत्यभान सानप, सुरेश गायकवाड आदींचा समावेश होता.
(फोटो २१ कांदा)

Web Title: Trying to visit the onion to the district collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.