कसबे-सुकेणेत बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:17 PM2020-02-14T12:17:43+5:302020-02-14T12:17:50+5:30
कसबे सुकेणे: गेल्या आठ दिवसांपासून येथील कारखानारोड भागात दहशत माजविणा-या चार बिबट्यांपैकी एकाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.
कसबे सुकेणे: गेल्या आठ दिवसांपासून येथील कारखानारोड भागात दहशत माजविणा-या चार बिबट्यांपैकी एकाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. कसबे सुकेणे येथील वाडी वस्ती भागातील माधव जयराम भंडारे यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंज-यात शुक्र वारी पहाटे साडे पाच वाजता बिबट्या जेरबंद झाला. काही दिवसांपासून कसबे-सुकेणे शिवारात बिबट्याचा वावर होता. एक मादी, तीन बछडे असा संचार या परिसरात असल्याचे माजी सरपंच नाना पाटील, अतुल अशोक भंडारे, महेश भंडारे, नंदु भंडारे, अमोल भंडारे या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. शुक्र वारी पहाटे बिबट्या पिंज-यात अडकला असुन शेतक-यांनी सुटकेचा निश्वास टाकला असला तरी या भागात आणखी एक मादी व दोन बछडयांचा संचार असल्याची माहिती निलेश भंडारे, संतोष भंडारे, धनंजय भंडारे यांनी दिली. दरम्यान बिबट्या जेरबंद झालेल्या घटनास्थळी वन विभागाच्या अधिका-यांनी तत्काळ धाव घेतली असुन सकाळी दहा वाजेपर्यंत पिंजरा व बिबटया ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू होती.