शहरी संशोधनाला महापालिकेचे पाठबळ तुकाराम मुंढे : ‘इनोव्हेशन डे’चा समारोप; विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:58 AM2018-04-06T00:58:34+5:302018-04-06T00:58:34+5:30
सिडको : आज लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता आहे, परंतु त्याचा उपयोग करून घेणे ही काळाची गरज आहे.
सिडको : आज लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता आहे, परंतु त्याचा उपयोग करून घेणे ही काळाची गरज आहे. कोणतीही नावीन्यता असणाऱ्या विज्ञानाचा जर व्यवस्थित वापर केला तर त्यातून नक्कीच सकारात्मकता दिसून येणार असून, आगामी काळात अशाच नावीन्यता असणाºया विज्ञानाची गरज असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. शहरी भागातील समस्या सोडविणारे संशोधन केल्यास महापालिकेच्या वतीने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन् व नाशिक डिस्ट्रिक इनोव्हेटिव्ह कौन्सिल (एनडीआयसी) यांच्या पुढाकाराने आयोजित नाशिक ‘इनोव्हेशन डे’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आयुक्तमुंढे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मराठवाडा आॅटो कॉम्पोनंटचे डायरेक्टर राम भोगले, टीसीएसचे संदीप शिंदे, इस्पॅलियर ग्रुपचे डायरेक्टर सचिन जोशी, इएसडीएस प्रा.लि.चे डायरेक्टर पीयूष सोमाणी, एनईसीचे उपाध्यक्ष के. एस. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मुंढे म्हणाले संशोधन हे कधीही, कुठेही घडू शकते परंतु त्याचा उपयोग हा समाजाला कसा आणि किती प्रमाणात होते यावर त्याचे यश अवलंबून असते. शहरातील आॅटोमोटिव्ह क्षेत्रात इनोव्हेशनसाठी भरपूर संधी उपलब्ध असल्याचेही मुंढे यांनी सांगितले. संदीप शिंदे यांनी सांगितले की नाशिकमध्ये अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता दिसून येते असून, त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शकाची गरज आहे. नावीन्यतापूर्ण समाज तयार करण्यासाठी नावीन्यतेचा स्वीकार करण्याची संस्कृतीही जोपासण्याचे आवाहनही शिंदे यांनी केले. राम भोगले यांनी स्वत:ची इनोव्हेशनविषयीची संकल्पना मांडली. इनोव्हेशन (नावीन्यता) अभावामुळे मानवी जीवनात विकास खुंटत असून, इनोव्हेशनवर कोणत्याही मर्यादा नसाव्यात, असेही भोगले यांनी सांगितले.
समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. एनइसीचे उपाध्यक्ष के. एस. पाटील व इव्हेंटप्रमुख कैलास सरोदे यांनी आभार मानले.