तुकाराम मुंढे चुकीचे, की राधाकृष्ण गमे बरोबर?
By संजय पाठक | Published: June 22, 2019 04:51 PM2019-06-22T16:51:06+5:302019-06-22T16:55:20+5:30
नाशिक- महापालिकेत ज्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली ते आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आलेले राधाकृष्ण गमे हे अत्यंत परिपक्व अधिकारी मानले जातात. महसुल सेवेचा अनुभव असल्याने तोंडाने न बोलता लेखणीतून मुंढे यांच्यासारखेच कठोर निर्णय घेतात असा महापालिकेतील बहुतांशी अनुभव!एका आयएसएस अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय फिरवता येत नाही असे सांगून मुंढे यांचे अनेक निर्णय त्यांनी पुढेही सुरू ठेवले असले तरी अलिकडील काळात त्यांनी जे दोन धाडसी निर्णय घेतले किंवा विचार व्यक्त केले ते बघता मुंढे बरोबर की गमे असा प्रश्न निर्माण झाला तर गैर नाही.
नाशिक- महापालिकेत ज्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली ते आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर आलेले राधाकृष्ण गमे हे अत्यंत परिपक्व अधिकारी मानले जातात. महसुल सेवेचा अनुभव असल्याने तोंडाने न बोलता लेखणीतून मुंढे यांच्यासारखेच कठोर निर्णय घेतात असा महापालिकेतील बहुतांशी अनुभव!एका आयएसएस अधिकाऱ्याने घेतलेला निर्णय फिरवता येत नाही असे सांगून मुंढे यांचे अनेक निर्णय त्यांनी पुढेही सुरू ठेवले असले तरी अलिकडील काळात त्यांनी जे दोन धाडसी निर्णय घेतले किंवा विचार व्यक्त केले ते बघता मुंढे बरोबर की गमे असा प्रश्न निर्माण झाला तर गैर नाही.
गमे यांच्या तुलनेत गमे यांचा अनुभव आणि सेवा दोन्हींचा अनुभव अधिक असल्याने त्यांच्या कार्यशैलीतील अनेक बाबी ढळकपणे अनुभवायला येतात. विशेषत: प्रशासन चालवताना आणि लोकप्रतिनिधींशी परखडपणे बोलून तडकाफडकी घेण्याचा मुंडे यांच्या प्रमाणे निर्णय घेण्याचा त्यांचा स्वभाव नाही. सर्वाशी गोड बोलून बघतो, करतो माहिती घेतो आणि शासनाकडून मार्गदर्शन मागवतो असे सांगून ते सहज विषय बाजुला सारतात आणि त्यांना घ्यायचा तोच निर्णय घेऊन अंमलातही आणतात. ते गोड बोलतात किंबहूना ऐकून घेतात हा अनेकांना मोठा गुण वाटतो. सहाजिकच मुंढे याच्या काळातील करवाढीचा निर्णय जैसे थे ठेवल्यानंतर देखील नगरसेवक आणि अन्य व्यक्तींचा रोष दिसून आला नाही.
शेतीवरील कर कमी न करता याविषयी मतभिन्नता असल्याने शासन म्हणजेच थर्ड अंपायरकडे पाठवून त्यांनी विषय बाजुला ठेवला आणि अन्य कर आकरणी सुरूच ठेवली. सामासिक अंतरावरील कर आकरणी रद्द केली तरी सोसायट्यांमधील वाहनतळावरील कर कायमच आहे. मात्र, त्यावर खदखद होत नाहीये हे विशेष. मुंढे यांनी रद्द केलेली अनेक कामे गमे यांनी कायम ठेवली. आणि नवा गडी नवा राज सुरू केला. परंतु त्यावर देखील टीका कोणी केलेली नाही.
प्रश्न आता निर्माण झाला आहे तो दोन निर्णयांचा. त्यातील पहिला निर्णय म्हणजे तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या १३६ आंगणवाड्या बंद केल्या होत्या आणि नगरसेवक तसेच आंगणवाडी सेविकांनी आंदोलने करून तसेच महासभेत दोन तीन वेळा ठराव करूनही मुंढे बधले नव्हते. महापालिकेने पटसंख्येबाबत तयार केलेले नियम आणि मुलांचे हित या दोन गोष्टींवर त्यांनी भर दिला होता तर नगरसेवक हे आंगणवाडी सेविकांच्या रोजगारासाठी त्या सुरू ठेवाव्या असा आग्रह धरीत असल्याचा मुंढे यांचा दावा होता. मुंढे यांनी फेर सर्वेक्षण करून आंगणवाडी सेविकांना पुन्हा एकवार पटसंख्या वाढविण्यासाठी संधी देण्याच्या विरोधात होते. मात्र, गमे यांनी मात्र आंगणवाड्यांच सर्वेक्षण करून १३६ पैकी ६२ आंगणवाड्या पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविका वर्षानुवर्षे काम करतात आणि त्यामुळे त्यांना एकाएकी घरी बसवणे योग्य नाही ही कदाचित त्यांची भूमिका मानवतवादी असेलही मग, कायद्यात नसेल तर काय. मग मुंढे यांची भूमिकाच चुकीची होती काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दुसरा निर्णय थोडा संवेदनशील आणि भावनिक विषय होता. तो म्हणजे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या स्वागताचा. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळ पालखीचे स्वागत करण्याची परंपरा होती. परंतु उच्च न्यायालयाने एका याचिकेत याबाबत धार्मिक सोहळ्यास महापालिकेचा खर्च करण्यास निर्बंध घातले आणि त्या आधारे शासनाने पत्रक काढले त्याचा आधार घेऊन मुंढे यांनी धार्मिक सोहळ्यासाठी खर्च नाही केवळ मुलभूत सुविधा देऊ असे स्पष्ट केल्यानंतर मुंढे हे नास्तिक आहेत, वैगैेरे टीका झाली. आणि पालखीचे स्वागत स्थळही बदलले. मुंढे यांनी कुंभमेळ्यात ज्या प्रमाणे धार्मिक विधीत हस्तक्षेप न करता केवळ भाविक येणार म्हणून मुलभूत सेवा देण्याचे कर्तव्य पार पाडते. त्याच धर्तीवर येथेही केवळ पाणी वैगरे सुविधा दिल्या. परंतु वारकऱ्यांना टाळ मृदूंग देण्याच्या नावाखाली जे घोटाळे झाले ते बघता अशाप्रकारे भेटी देणार नाही असे त्यांनी सांगितले होते आणि पालखी स्वागत समितीने देखील घोटाळे बघितल्यानंतर मुंढे यांची भूमिका योग्य ठरवली होती. मात्र गमे यांनी आता यंदा विलंब झाला पुढिल वर्षांपासून जंगी स्वागताची तरतूद करू असे सांगितले.
कोट्यवधी रूपयांच्या खर्चाचा अपव्यय किंवा करणाºया महापालिकेचा निधी पालखी सोहळ्यासाठी केला तर गैर नाही, किंंबहुना पालखीचे स्वागत नाशिक पंचायत समितीत होणे ही बाब नामुष्कीला कारक आहे परंतु तरीही मग गमे यांनी याबाबत नक्की काय मनात घेतले हे मात्र कळले नाही.