कान्होबांच्या नजरेतून तुकारामांची जीवनकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:57 AM2018-11-28T00:57:06+5:302018-11-28T00:57:22+5:30

राज्य नाट्य स्पर्धा नाशिक : संत तुकाराम महाराज यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबत त्यांना कौटुंबिक परिस्थितीसह सामना कराव्या लागलेल्या विविध समस्या ...

 Tukaram's life story from Kanhoba's eyes | कान्होबांच्या नजरेतून तुकारामांची जीवनकथा

कान्होबांच्या नजरेतून तुकारामांची जीवनकथा

Next

राज्य नाट्य स्पर्धा

नाशिक : संत तुकाराम महाराज यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबत त्यांना कौटुंबिक परिस्थितीसह सामना कराव्या लागलेल्या विविध समस्या आणि तुकाराम महाराजांच्या विरक्त स्वभावामुळे त्यांच्या कुटुंबाची होणारी ससेहोलपट ‘आनंद ओवरी’च्या प्रयोगात संत कान्होबा यांच्या दृष्टिकोनातून दिग्दर्शक सुरेखा लहामगे यांनी प्रेक्षकांसमोर आणले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मंगळवारी (दि.२७) नाशिकच्या सुरभी थिएटरतर्फे दि. वा. मोकाशी लिखित ‘आनंद ओवरी’ सादरीकरण करण्यात आले. साक्षात्कारी, निर्भिड तथा एका अर्थाने बंडखोर कवीसोबतच वेदांत, अभंगवाणीतून सर्वसामान्यांपर्यंत प्रवाहित झालेले तुकोबाराय संत कान्होबांच्या नजरेतून कलाकारांनी रंगमचावर सादर केले. संत तुकाराम महाराज यांची भाविकता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिकचे महान द्योतक असले तरी त्यांच्या त्यांनी जवळून पाहिलेला दुष्काळ, कुटुंबातील मृत्यू, अशा अनुभावांनंतर निर्माण झालेले तत्त्वज्ञान व आपल्या आचार विचारातून केलेले लिखाण क र्ज रोखे इंद्रायणीत बुडविण्याचा प्रसंग अशा विविध माध्यमांतून त्यांनी समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रवास अनुभवलेल्या कान्होबांच्या नजरेतून तुकाराम महाराज या नाटकातून रंगविण्यात आले आहे. संदीप  कोते व राजेश शर्मा यांच्यासह  चंद्रवदन दीक्षित, नीलेश जाधव, मयूर चोपडे, राहुल सूर्यवंशी आदी कलाकारांनी लक्ष वेधून घेतले. नेपथ्य नैलेंद्र गौतम, प्रकाश योजना रवि रहाणे, संगीत शुभम वर्मा, रंभभूषा माणिक कानडे, वेशभूषा सुलभा लहामगे यांचे आहे.

Web Title:  Tukaram's life story from Kanhoba's eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.