तुलसी विवाह सोहळ्यात बांधल्या रेशीमगाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 09:08 PM2019-11-13T21:08:46+5:302019-11-13T21:11:12+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरातील संतोषी माता नगर परिसरात तुलसी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने सामाजिक बांधिलकीचे संदेश देत संतोषी माता मित्र मंडळाने मोठ्या थाटात शेकडो वºहाडींच्या साक्षीने दोन वधू वर जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यात आले.
पिंपळगाव बसवंत : परिसरातील संतोषी माता नगर परिसरात तुलसी विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने सामाजिक बांधिलकीचे संदेश देत संतोषी माता मित्र मंडळाने मोठ्या थाटात शेकडो वºहाडींच्या साक्षीने दोन वधू वर जोडप्यांना रेशीमगाठीत बांधण्यात आले.
पिंपळस येथील वधू अश्विनी कोकणगाव येथील कृष्णा आणि उंबरखेड येथील वधू मोनाली तर न्यायडोंगरी येथील वर शंकर यांना सातजन्माच्या बंधनात बांधण्यात आले.
सकाळी मांडव डहाळे कार्यक्र म झाल्यानंतर सायंकाळी दिवट्या बुदल्या व तुळशीला हळद लावण्याचा कार्यक्र म झाला. बुधवारी (दि.१३) सायंकाळी गोरज मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील चिंचखेड नंतर सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या तुलसी विवाह पिंपळगाव बसवंत परिसरात पार पडला.
या विवाह सोहळ्यामध्ये भव्य रथातून व बँड पथकांची जुगलबंदी करत, ढोल तश्याच्या गजरात वरांची शाही मिरवणूक काढण्यात आली. यासर्व सोहळ्याचे आयोजन श्री संतोषी माता सामाजिक, शैक्षणिक, कला, क्र ीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाने केले होते.
लग्न, मिरवणुकीसाठी दोन बँड व वर मिरवणुकीसाठी रथ, वधूसाठी संसार उपयोगी भांडी (कन्यादान) व सर्व लग्नाला उपस्तीत वºहाडी मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली होती. कार्यक्र म यशस्वी होण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक, केशव बनकर, अध्यक्ष केतन पुरकर, दत्तू जाधव, राजेन्द्र कडाळे, नामदेव विधाते, हिरामण उगले, रावसाहेब रकीबे, दिलीप सूर्यवंशी, गणेश कोपरे, प्रदीप वालवणे, विशाल पाखले, विनायक घोंगाने, प्रवीण वाघ, अविष्कार पुरकर, धनंजय संधान, नाना बैरागी, देवीदास दवंगे, दिगंबर क्षीरसागर, चेतन बनकर, संतोष जाधव, प्रवीण शिरसाठ, महेश रसाळ, गौरव शेवाळे, शुभम दवंगे, रोहित जाधव, गंगाधर कराटे, दिनेश मोरे, अजय विधाते, संदीप शेळके, विजय विधाते, संकेत बनकर, दीपक प्रसाद आदींनी या सोहळ्यात सहकार्य केले.
या सोहळ्या निमित्ताने गरीब कुटुंबातील जोडप्याचे थाटामाटात लग्न लावून एक वेगळंच समाधान मिळत आहे व या सामाजिक कामासाठी अनेक दानशूर व्यक्ती देखील मदत करत असतात आणि यापुढेही मंडळातर्फे ११ गरीब जोडप्याचा शाही सोहळा लावण्याचा आमचा मानस आहे.
- केशव बनकर,
संतोषी माता मित्र मंडळ ,
मार्गदर्शक.