तुळशी विवाहाची धुम थंडावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 03:26 PM2020-11-29T15:26:45+5:302020-11-29T15:27:56+5:30
मनमाड: मनमाड सह परिसरात सुरू असलेली तुळशीच्या लग्नाची धुम थंडावली आहे. शहरात अनेक ठिकाणी तुळशीच्या लग्णाची धुम सुरू होती.या नंतर आता लग्नसराईला प्रारंभ होणार आहे.
मनमाड : मनमाड सह परिसरात सुरू असलेली तुळशीच्या लग्नाची धुम थंडावली आहे. शहरात अनेक ठिकाणी तुळशीच्या लग्णाची धुम सुरू होती.या नंतर आता लग्नसराईला प्रारंभ होणार आहे.
आपल्या संस्कृतीमधे दिवाळीनंतर तुलशीविवाहाला अनन्य साधारण महत्व आहे. दर वर्षी कार्तीकी एकादशीला सुरू होणाऱ्या तुलशी विवाहाचा समारोप त्रिपुरी पोर्णीमेला होत असतो. द्वापारयुगात दिवाळीनंतरच्या काळात कृष्ण आणि रुक्मीणीचे शुभमंगल झाले होते. ही आठवण सदैव रहावी म्हणून दरवर्षी तुळशी विवाह लावले जात असल्याचे सांगन्यात येते. या वेळी रांगता कृष्ण (रंगनाथ) व तुळशी चा विवाह करण्यात येतो. या विवाहासाठी तांदुळ व धान्याच्या अक्षदा वापरण्यात येतात.
या बरोबरच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आवळीच्या झाडाचे पुजन केले जाते. पहाटे आवळीच्या झाडाचे पुजन करून त्या खाली विष्णूसहस्त्र नामाचा जप करण्यात येतो. तुळशीच्या विवाहाची धुम त्रिपुरी पोर्र्णीमला समाप्त झाली.त्या नंतर लग्नसराइ चा हंगाम सुरू झाला आहे.
भालूर येथील नंदकुमार कुलकर्णी व चंद्रशेखर गुंडे यांच्या निवास स्थानासमोर सामुदायीक तुळशी विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. तुळशी व कृष्णाची शास्त्रशुध्द पुजा करून सोहळा करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीत विवाह सोहळा पार पडला. महाआरती नंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी परिसरातील नागरीक व महिला मोठ्या संखेने उपस्थीत होते.द्वापारयुगात दिवाळीनंतरच्या काळात कृष्ण आणि रुक्मीणीचे शुभमंगल झाले होते. ही आठवण सदैव रहावी म्हणून दरवर्षी तुळशी विवाह लावले जात असल्याचे सांगन्यात येते. या वेळी रांगता कृष्ण (रंगनाथ) व तुळशी चा विवाह करण्यात येतो.