विवाह सोहळ्यातील सूर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 06:56 PM2020-10-04T18:56:32+5:302020-10-04T18:57:21+5:30
लासलगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मंगलकार्य, विवाहकार्य यावर निर्बंध आल्यामुळे बॅण्ड व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून विवाह तर काही प्रमाणात सुरू झाले परंतु या विवाहात बॅण्डचा मंगल सूर बंद आहे. विवाहकार्यातील हा सूर पुन्हा एकदा सुरु करावा अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नाशिक जिल्हा ब्रास बॅण्ड असोशिएशन व निफाड तालुका ब्रास बॅण्ड असोसिएशनच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली.
लासलगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, मंगलकार्य, विवाहकार्य यावर निर्बंध आल्यामुळे बॅण्ड व्यावसायिक अडचणीत आले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून विवाह तर काही प्रमाणात सुरू झाले परंतु या विवाहात बॅण्डचा मंगल सूर बंद आहे. विवाहकार्यातील हा सूर पुन्हा एकदा सुरु करावा अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नाशिक जिल्हा ब्रास बॅण्ड असोशिएशन व निफाड तालुका ब्रास बॅण्ड असोसिएशनच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली. महाराष्ट्रातील खूप मोठा कलाकारवर्ग हा बॅण्ड व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करतो आणि बॅण्डला परवानगी नसल्याने या सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बॅण्डमालकांची व कलाकारांची उपासमार टाळण्यासाठी तातडीने राज्यातील बॅण्ड व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, यासाठी सर्व बॅण्डमालकांनी महसूलमंत्र्यांना विनंती केली. महसूलमंत्र्यांनी पुढील अनलॉकमध्ये परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.