पर्यटकांच्या मदतीसाठी नाशिकमध्ये ‘टुरिस्ट पोलीस’
By admin | Published: March 27, 2017 01:05 AM2017-03-27T01:05:40+5:302017-03-27T01:05:55+5:30
नाशिक : पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण व मदतीसाठी पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंगल यांनी ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीसह्ण ही संकल्पना मांडली असून, ती लवकरच कार्यान्वित होणार आहे़
नाशिक : धार्मिक पर्यटनस्थळ वा मंदिराचे शहर ही नाशिकची पुरातन व प्रमुख ओळख़ यामध्ये दिवसेंदिवस प्रगती होऊन औद्योगिक विस्तार, मुंबईच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वपूर्ण शहर, वाइन कॅपिटल अशी शहराची प्रगती झाली़, असे असले तरी शहरात येणाऱ्या देशातील वा जगभरातील पर्यटकांमध्ये बहुतांशी पर्यटक हे धार्मिक कार्यासाठीच येतात़ या पर्यटकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण व मदतीसाठी पोलीस आयुक्तरवींद्रकुमार सिंगल यांनी ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीसह्ण ही संकल्पना मांडली असून, ती लवकरच कार्यान्वित होणार आहे़ नाशिक शहराची ओळख हे धार्मिक क्षेत्र असून, प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात पंचवटीत वास्तव्य केल्याचे सांगितले जाते़ शहरात पंचवटीतील रामकुंड, तपोवन, सीतागुंफा, मुक्तिधाम, सोमेश्वर, नवश्या गणपती यांसह दादासाहेब फाळके स्मारक, नेहरू वनोद्यान, असे अनेक पर्यटन व धार्मिक स्थळे आहेत़ अस्थिविसर्जनासाठी तर देश तसेच जगभरातून नागरिक येतात़ याबराबरोच वाइन कॅ पिटल, यंत्रभूमी अशीही नाशिकची ओळख आहे़ नाशिक शहरात येणाऱ्या पर्यटकांना अडचणींचे निराकरण करण्यासाठी आता नाशिक पोलीस मदत करणार आहेत़
पोलीस आयुक्त सिंगल यांनी ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीस’ ही संकल्पना मांडली असून, लवकरच ते कार्यान्वितही केले जाणार आहे़ नाशिक शहरातील पर्यटनस्थळी पर्यटकांना आलेल्या अडचणी या टुरिस्ट पोलिसांकडून सोडविल्या जाणार आहेत़ या पोलिसांसाठी एक स्वतंत्र वाहन असून त्यावर ‘नाशिक शहर टुरिस्ट पोलीस’ लोगो, नाशिकची ओळख असलेला प्रवास तसेच हेल्पलाइन नंबर असणार आहे़ यावाहनाच्या डिझाइनचे काम आर्टिस्ट एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे़ या वाहनामध्ये एक अधिकारी, तीन महिला पोलीस कर्मचारी व चालक असा सुमारे पाच कर्मचाऱ्यांचा ताफा एका शिफ्टमध्ये असणार आहे़
शहरात येणाऱ्या पर्यटकांना शहराची माहिती नसल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते़ यातून अनेकदा त्यांची फसवणूक होते, मात्र त्यांना वेळेत मदत मिळत नसल्याने शहराची बदनामी होते़ त्यांचा शहराकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो़(प्रतिनिधी)