हळद किलोमागे ५० रुपयांनी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:14 AM2021-03-22T04:14:07+5:302021-03-22T04:14:07+5:30
चौकट- वांगी २० रु. किलो गतसप्ताहाच्या तुलनेत वांग्याच्या दरात घसरण झाली असून घाउक बाजारात वांगी ७ ते २० रुपये ...
चौकट-
वांगी २० रु. किलो
गतसप्ताहाच्या तुलनेत वांग्याच्या दरात घसरण झाली असून घाउक बाजारात वांगी ७ ते २० रुपये किलोने तर कांदापात दहा ते २५ रुपये जुडी या दराने विकली जात आहे. तर कारल्याला २१ पासून २९ रुपये किलोचा दर मिळत आहे.
चौकट-
खाद्यतेल स्थिर
किराणा बाजारात या सप्ताहात खाद्यतेलाच्या किमतीमध्ये दोन ते तीन रुपयांनी घसरण झाली असून इतर वस्तूंचे भाव स्थिर आहेत. मसाल्याच्या पदार्थांना सध्या चांगला उठाव आहे.
चौकट-
सफरचंद १३० रु. किलो
फळबाजारात फळांची आवक कमी झाल्याने त्याचा किमतीवर परिणाम झाला आहे. घाउक बाजारात सफरचंदाचे दर ९० ते १३० रुपये तर डाळिंब ८० ते ८५ रुपये किलोपर्यंत विकले जात आहे.
कोट-
मसाले तयार करण्याच्या काळातच मिरचीचे दर वाढले असल्याने दरवर्षीच्या तुलनेत मसाले बनविण्याचा खर्च वाढला आहे. यामुळे प्रमाण कमी करावे लागणार आहे.
- शकुंतला पवार, गृहिणी
कोट-
शेतीमालाचे दर कधी उतरतील याचा कोणताही अंदाज नाही. मध्यंतरी शेतकऱ्यांना भाजीपाला कवडीमोल दराने विकावा लागला. अनेकांना उत्पादन खर्चही मिळाला नाही. शेतीपुरक वस्तुंच्या किमतीत मा्त्र मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेती करणे खर्चिक झाले आहे.
- दिगंबर दौंडे, शेतकरी
कोट-
नागरिकांना बंदचा धसका घेतल्याने त्याचा किराणा बाजारातील ग्राहकावर परिणाम झाला आहे. यामुळे या सप्ताहात किराणा बाजार स्थिर होता. मसाल्याच्या पदार्थांव्यतिरिक्त इतर किराणा मालाला फारसा उठाव नाही.
- शेखर दशपुते, किराणा व्यापारी
नाशिक बाजार समितीमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची