गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 02:09 PM2019-02-12T14:09:31+5:302019-02-12T15:10:07+5:30

मनमाड : पुणे इंदूर महामार्गावर येवल्याहून मनमाडकडे औद्योगिक गॅस सिलेंडर घेऊन जात असलेला ट्रक उलटला. अपघातानंतर चालकाच्या अंगावर कुठलीही जखम नसल्याने ट्रक चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी शव विच्छेदनानंतर खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Turn gas cylinder carrying truck overturned | गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला

गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला

Next

मनमाड : पुणे इंदूर महामार्गावर येवल्याहून मनमाडकडे औद्योगिक गॅस सिलेंडर घेऊन जात असलेला ट्रक पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर चालकाच्या अंगावर कुठलीही जखम नसल्याने ट्रक चालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी शव विच्छेदनानंतर खरे कारण स्पष्ट होणार आहे. औद्योगिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रोजन गॅस सिलेंडर घेऊन मनमाड कडून औरंगाबाद कडे जात असलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनकवाडे जवळील गोरक्षनाथ डोंगर परिसरात रस्त्यावरून पलटी झाला. सुदैवाने सर्व रिकामे गॅस सिलेंडर असल्याने मोठा धोका टळला आहे.अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता. येवला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या अपघातात ट्रक चालक गजेंद्र एस सिंग रा: बेहला कोलकाता (पश्चिम बंगाल) याचा मृत्यू झाला. मयत चालकाच्या शरीरावर खरचटल्याच्या देखील जखमा नसल्याने त्याचा अपघाताच्या आधी किंवा नंतर हृदयविकाराने मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी शवविच्छेदन अहवाला नंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.

Web Title: Turn gas cylinder carrying truck overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक