दिंडोरीत व्यावसायिकांनी ठेवले व्यवहार बंद
By admin | Published: July 21, 2016 12:19 AM2016-07-21T00:19:48+5:302016-07-21T00:23:35+5:30
दिंडोरीत व्यावसायिकांनी ठेवले व्यवहार बंद
दिंडोरी : कोपर्डी येथील
मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्त्येप्रकरणी दिंडोरी तालुकवासीयांनी पक्षभेद विसरून एकत्र येत शहर बंद ठेवले.
यावेळी निषेध करत आरोपींना
कठोर शासन करण्याची मागणी केली.
मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मनोज ढिकले, शिवसेना शहरप्रमुख रमेश बोरस्ते, नरेश देशमुख, बापू पाटील, रणजीत देशमुख, दीपक जाधव, जयवंत जाधव, उमेश आंबेकर, तुषार कापसे आदिंसह नागरिकांनी पोलीस निरीक्षक मधुकर गावित, तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देत घटनेचा निषेध नोंदविला.
सकाळी ९ वाजता येथील नागरिकांनी दिंडोरी बंद ठेवण्याची येथील व्यापारी व दुकानदारांना विनंती केली. त्यास त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद केली. संपूर्ण दिवसभर दुकाने बंद ठेवल्याने व्यवहार बंद झाले होते. पालखेड रोड निळवंडी रोड आदि परिसरात दुपारी शुकशुकाट जाणवत होता.
यावेळी आरोपींवर कठोर कारवाई करावी, कठोर कायदा
व्हावा, अशी मागणी केली
आहे. निवेदनात घटनेचा निषेध
करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी
केली. (वार्ताहर)