संपामुळे उलाढाल मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:22 AM2017-10-20T00:22:15+5:302017-10-20T00:23:27+5:30
एसटी : दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट त्र्यंबकेश्वर : एसटीचा संप आज तिसºया दिवशीही मिटला नसल्याने येथे येणाºया यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्याचा परिणाम येथील विविध व्यवसायावर झाल्यामुळे येथील आर्थिक उलाढाल रोडावली आहे. हॉटेल, पूजेचे सामान, प्रसाद विक्र ी, फुले विक्रे ते, एवढेच नव्हे तर गायींसाठी घास विकणाºया महिलांच्या व्यवसायांवरदेखील गदा आली आहे.
एसटी : दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट
त्र्यंबकेश्वर : एसटीचा संप आज तिसºया दिवशीही मिटला नसल्याने येथे येणाºया यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्याचा परिणाम येथील विविध व्यवसायावर झाल्यामुळे येथील आर्थिक उलाढाल रोडावली आहे. हॉटेल, पूजेचे सामान, प्रसाद विक्र ी, फुले विक्रे ते, एवढेच नव्हे तर गायींसाठी घास विकणाºया महिलांच्या व्यवसायांवरदेखील गदा आली आहे.
केवळ एसटी बसने प्रवास करणाºया यात्रेकरूंमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. त्र्यंबकच्या बसस्थानकावर एकही बस उभी नसल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. प्रवासी टॅक्सीज मन मानेल तसे भाडे आकारीत आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी १००, १२५ व
१५० रुपयापर्यंत प्रतिसीट भाडे आकारले जात असल्याने प्रवासी वैतागले.
पहिल्या दिवशी प्रवासी गाफील असल्याने प्रवाशांना नाइलाजाने भाडे अदा करावे लागले. त्यातही तिसºया दिवशी एसटी वगळता खासगी वाहनाने येणाºया भाविकांच्या
संख्येत सध्या घट झाली आहे. शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचीदेखील संपामुळे मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
त्र्यंबकच्या बसस्थानकात बस सुरू होईल या आशेने नांदगाव कोहळी, खरवळ, हरसूल आदी भागातील प्रवासी जमले होते; मात्र त्यांचीही गैरसोय झाली. आज दिवाळीचा मुख्य दिवस असल्याने परिसरातील खेड्यापाड्यातून स्वत:ची दुचाकी, काळी पिवळी प्रवासी टॅक्सी, टेम्पो आदी वाहनाने काही नागरिक प्रवास करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे दिवाळीची खरेदी, फटाके खरेदी आदींसाठी ग्राहकांची काहीशी गर्दी दिसून आली.त्र्यंबकेश्वर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तालुक्यातील लोकांचा लोंढा काही ना काही कारणामुळे येथे असतोच. अशा प्रवाशांचेही बसेस सुरू न झाल्यामुळे हाल होत आहेत.