देवमामलेदारांच्या स्मारक उभारणीवरून तूतू-मैमै
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 12:11 AM2022-02-13T00:11:20+5:302022-02-13T00:12:05+5:30
सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारक उभारणीवरून विरोधकांनी भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची राळ उडवली आहे. सत्ताधारी मंडळींनीदेखील विरोधकांची पोलखोल करणारी पत्रकबाजी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारक उभारणीवरून विरोधकांनी भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची राळ उडवली आहे. सत्ताधारी मंडळींनीदेखील विरोधकांची पोलखोल करणारी पत्रकबाजी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
२००३ पासून मागणी
नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी २००३ मध्ये शहराचे ग्रामदैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे जुनी कचेरी व महाराजांचे निवासस्थान असलेले ठिकाण व परिसराचे स्मारक व्हावे, अशी मागणी केली होती. तेव्हापासून खऱ्या अर्थाने देवमामलेदार महाराजांच्या स्मारकाला चालना मिळाली. मोरे यांनी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा करून त्यांनी स्मारकाच्या विकासासाठी या तीर्थक्षेत्राला ह्यबह्ण दर्जादेखील प्राप्त करून घेतला.
३ कोटी ८० लाखांचा निधी
तत्कालीन युती सरकारने या क्षेत्राच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून ३ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, १६ लाख रुपये आत्तापर्यंत खर्च करण्यात आले आहेत. मात्र, हे पैसे कुठे खर्च केलेत, याचा सवाल उपस्थित करून विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी विरोधात रान उठविण्याचा प्रयत्न केला आहे.
-------------------
शहराचे आराध्यदैवत यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या कामासाठी मोठा निधी आला आहे. मात्र, कोणतेही काम न करता १६ लाख रुपयांचा निधी लाटण्याचे पाप सत्ताधारी मंडळींनी केले आहे. याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी.
- विजय वाघ, माजी नगराध्यक्ष
देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या नगरीत भ्रष्टाचार करणाऱ्या मंडळीला जनता सजा देते, हे विरोधकांनी अनुभवले आहे. मी महाराजांचे स्मारक व्हावे म्हणून मिळालेल्या यशाला खीळ मिळाले, हे यश विरोधकांना शांत बसू देत नाही. मी जर या पवित्र कामात भ्रष्टाचार केला असेल तर जनता आगामी निवडणुकीत दूध का दूध, पाणी का पाणी करेल.
- सुनील मोरे, नगराध्यक्ष, सटाणा