शहरात कोरोनाचा बारावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 10:24 PM2020-06-03T22:24:00+5:302020-06-04T00:48:21+5:30

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असून, टाकळी येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्युपश्चात पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात बुधवारी (दि.३) दिवसभरात ६ बाधित रुग्ण आढळले असुन त्यामुळे बधितांची संख्या २५६ झाली आहे.

Twelfth victim of Corona in the city | शहरात कोरोनाचा बारावा बळी

शहरात कोरोनाचा बारावा बळी

Next

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत असून, टाकळी येथील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्युपश्चात पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शहरात बुधवारी (दि.३) दिवसभरात ६ बाधित रुग्ण आढळले असुन त्यामुळे बधितांची संख्या २५६ झाली आहे.
कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यातच आता मृत्युचे प्रमाण देखील वाढू लागल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगर टाकळी येथील एका इसमाचा कोरोनामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. सदरचा व्यक्ती हा टाकळी येथील प्रतिबंधित क्षेत्राच्या जवळच वास्तव्याला होता. त्याला नक्की संसर्ग कसा झाला हे आता अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी प्रशासन त्याचा शोध घेत आहे. मात्र, या इसमास मधुमेहाचा त्रास होता, त्यातच श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला ३१ मे रोजी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी (दि. २) सकाळी त्याचे निधन झाले, तर सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पंचवटीतील कलानगर परिसरात ४६ वर्षीय इसमाचादेखील पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. सिडकोतील उत्तमनगर येथे एका पिता -पुत्राचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आडगाव येथील कोणार्कनगर येथील ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
नाशिक शहराच्या विविध भागात रुग्ण आढळत असल्याने महापालिकेच्या यंत्रणेची धावपळ वाढली आहे. शहरात सध्या ६६ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली आहेत.

Web Title: Twelfth victim of Corona in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक