नाशिक मनपाच्या बारा इमारती सौर उर्जेने उजळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 02:56 PM2019-12-29T14:56:48+5:302019-12-29T14:59:07+5:30
नाशिक- शाश्वत आणि पर्यावरण स्नेही विज पुरवठ्यासाठी महापालिकेच्या पंधरा इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प राबविले जात आहे. त्यातील बारा इमारतींवर सोलर रूप टॉप बसविण्यात आले असून नव्या वर्षात या इमारती सौर उर्जेने उजळून निघणार आहेत. या सौर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून महापालिका १ मेगा वॅट वीजेची निर्मिती करणार असून वर्षाकाठी सुमारे एक कोटी रूपयांची बचत होणार आहे.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक शहरामध्ये विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्याअंतर्गतच सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पारंपरिक वीजेची बचत आणि अपारंपारिक उर्जा स्त्रोतांवर भर देण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटी म्हणजे संपुर्ण शहरातील नागरीकांनी सौर उर्जेचा वापर करणे आवश्यक आहे. परंतु नागरीकांना प्रोत्साहीत करण्यासाठी महापालिकेने त्याचा प्रारंभ मात्र आपल्यापासून केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या बारा इमारती नव्या वर्षाच्या प्रारंभीच सौर ऊर्जेने उजळून निघणार आहेत. सौर ऊर्जेमुळे वर्षाकाठी महापालिकेचे जवळपास एक कोटी रु पये वाचणार आहेत. पंचवीस वर्षे कालावधीसाठी पीपीपी तत्त्वावर मे. वासंग सोलर वन प्रा. लिमिटेड तर्फे हा प्रकल्प राबवला जात आहे. त्यामुळे देखभाल दुरूस्तीचा खर्च देखील ह कंपनीच करणार आहे.
महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन (२०७.२ किलोवॅट वीज), सिडको विभागीय कार्यालय येथे (१५.५४ किलोवॅट , जिजामाता हॉस्पिटल (१३.२ किलोवॅट),मायको हॉस्पिटल (१०.५६ किलोवॅट), नाशिकरोड विभागीय कार्यालय (५२.८ किलोवॅट),लोकनेते पंडीतराव खैरे पंचवटी विभागीय कार्यालय(पहिला टप्पा २५.१६ तर दुसऱ्या टप्प्यात ३१.४५ किलोवॅट), पंटवटी विभागातील अग्निशमन केंद्र (२६.४ किलोवॅट),शिंगाडा तलाव अग्निशमन केंद्र ( १३.२ किलोवॅट ),महात्मा फुले कलादालन (५९.२ किलोवॅट),फाळके स्मारक (६६.३३ किलोवॅट), झाकीर हुसेन रु ग्णालय (१००.६४ किलोवॅट) या इमारतीत वीज निर्मिती होणार आहे.