एकाच रात्री बारा घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:17 AM2021-02-25T04:17:17+5:302021-02-25T04:17:17+5:30

मंगळवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास पेठ येथील सुलभानगर व सप्तश्रृंगी नगर परिसरात एकाच रात्री १२ घरांची कुलुपे कटरने कापून चोरी ...

Twelve burglaries in one night; Lampas stole millions | एकाच रात्री बारा घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

एकाच रात्री बारा घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

Next

मंगळवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास पेठ येथील सुलभानगर व सप्तश्रृंगी नगर परिसरात एकाच रात्री १२ घरांची कुलुपे कटरने कापून चोरी करण्यात आली. चोरांनी चोरी करताना आजूबाजूच्या घरांची बाहेरून कडी लावून घेतलेले आढळल्याने १५ ते २० जणांच्या सराईत टोळीने चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. चोरांचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉड पथक व फिंगर प्रिंट घेणारे पथक शहरात दाखल झाले आहे. या वसाहतीत राहणारे बहुतांश सरकारी नोकरदार, शिक्षक वर्ग असल्याने लाखोंचा ऐवज गेल्याचे फिर्यादी हेमराज तुकाराम मानभाव यांनी दिली. पेठ पोलिसांनी पंचनामा करताना सुमारे रोख रकमेसह ३१ हजारांची चोरी झाली असून अजून ११ घरांची शहानिशा होणे बाकी आहे. घरमालक येईपर्यत नेमकी पेठमधून किती रुपयांची लूट झाली हे पोलिसांना सांगता येत नाही. मात्र टोळीने लुटीचा मोर्चा आदिवासी दुर्गम भागाकडे वळविण्याने दुकानदार, व्यापारी, लहान मोठे व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांबरोबर नोकरदार वर्गामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख, जाडर, शिपाई भोये हे करीत आहेत.

===Photopath===

240221\24nsk_20_24022021_13.jpg

===Caption===

पेठ येथे घरफोडीत अस्ताव्यस्त पडलेले साहित्य.

Web Title: Twelve burglaries in one night; Lampas stole millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.