बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्र मास गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 07:38 PM2019-02-20T19:38:14+5:302019-02-20T19:38:37+5:30
मुखेड : माघ पोर्णिमेनिमित्त येथे खंडोबा महाराजांच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
मुखेड : माघ पोर्णिमेनिमित्त येथे खंडोबा महाराजांच्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
एकाला एक जोडुन अश्या बारागाडयांमध्ये भाविक बसलेले असतात. जो गाड्या ओढतो त्याला खंडोबा महाराजांची प्रतिमा म्हणून पाहिले जाते. तो सात दिवस अगोदरपासुनच खंडोबा महाराजांच्या मंदिरात व्रतस्थ बसलेला असतो. बारागाड्या ओढण्या अगोदर खंडोबा महाराजांची पालखीतुन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गांवातील सर्वे देवदेवतांचे पुजन केले गेले. त्याकरीता ग्रामस्थच नव्हे तर आसपासच्या गावातील रहिवासी ही सहभागी झाले होते. सायंकालच्या सुमारास बारागाडया ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यावेळी आसमंतात भंडाऱ्याची उधळण करण्यात आल्याने अवघा परिसर सोन्यासारखा पिवळे धम्मक झाला होता.
ह्यावेळी बारागाडया ओढ न्याचा मान सचिन दिनकर आहेर यांना मिळाला होता. बारागाडया ओढ त्यानंतर भाविकांनी खंडोबा महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन श्रीफळ वाढविण्यासाठी एकच गर्दी केली होती.