बारा तासांत दोघा लूटारूंना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 07:02 PM2020-07-19T19:02:19+5:302020-07-19T19:02:46+5:30

मोबाईल व तीन हजाराची रोकड हिसकावून या दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. यानंतर दोघा मित्रांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली.

In twelve hours the two robbers were handcuffed | बारा तासांत दोघा लूटारूंना ठोकल्या बेड्या

संग्रहित छायाचित्र

Next

नाशिक : दुचाकीवरून पाठलाग करत दोघांनी चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारांना लुटल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत रविवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास घडली. या गुन्ह्यातील संशयित लुटारूंचा अवघ्या बारा तासांत शोध घेत पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत द्वारकेजवळ फिर्यादी गौरव बाळासाहेब परदेशी व त्यांचा मित्र मोहसीन सय्यद हे दुचाकीने (एम.एच१५ जीयू६२१५) पोहचले असता तेथे त्यांचा पाठलाग करत अ‍ॅक्टिवावरून (एम.एच१५ एफबी ६८३८) दोघा अज्ञात लुटारूंनी येत त्यांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने रोखून धरले. यावेळी त्यांनी मोहसीनला खाली ओढत फोनवर कोणाला तरी ''बकरा मिळाला टाकू कार मारू'' असे विचारले व त्यानंतर दम भरल्याचे गौरवने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्याजवळील मोबाईल व तीन हजाराची रोकड हिसकावून या दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. यानंतर दोघा मित्रांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ दोघा अज्ञात लुटारूंविरूध्द जबरी लूटीचा गुन्हा दाखल करत दुचाकीच्या क्रमांकावरून सहायक निरिक्षक डी.डी.इंगोले यांच्या पथकाने शोध घेत शंकर सतीश रिडलॉन (रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा), नितीन किरण पवार (रा.बजरंगवाडी) या दोघा संशयितांना रविवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली असून सोमवारी संबंधितांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: In twelve hours the two robbers were handcuffed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.