ऑनलाइन फुड डिलिव्हरीच्या नावाने सव्वादोन लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:14 AM2021-04-20T04:14:26+5:302021-04-20T04:14:26+5:30
याप्रकरणी संशयिताविरुध्द सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिक मोहन विष्णू मते (रा. मते वस्ती, ...
याप्रकरणी संशयिताविरुध्द सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल व्यावसायिक मोहन विष्णू मते (रा. मते वस्ती, आडगाव) ऑनलाइन फुड डिलिव्हरी सुरू करण्यासाठी त्यांनी इंटरनेटवर माहिती शोधून एका
क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी लबाडाने त्यांना जाळ्यात अडकवत विविध ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या कंपन्यांची नावे सांगून काही ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करण्यास सांगितले. दोन ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर त्या सायबर गुन्हेगाराने मते यांना विविध सूचना करत प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितली. दरम्यान, त्याने मते
यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहितीदेखील जाणून घेतली आणि ‘गुगल पे’च्या माध्यमातून ऑनलाईन २ लाख
३९ हजार ९७ रुपये रक्कम काढून घेत गंडा घातल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार १४ मार्चच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.