शिर्डीतील दुहेरी खून खटल्याप्रकरणी कुख्यात गुंंड पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:58 AM2018-05-04T01:58:50+5:302018-05-04T05:47:27+5:30

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिर्डीतील दुहेरी खून खटल्याप्रकरणी कुख्यात गुंंड पाप्या शेखसह १२ जणांना विशेष मकोका न्यायालयाने गुरुवारी (दि. ३) जन्मठेप आणि एक कोटी ३४ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

Twelve murders in Shirdi, 12 people including infamous gangster Papiya Shaikh | शिर्डीतील दुहेरी खून खटल्याप्रकरणी कुख्यात गुंंड पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप

शिर्डीतील दुहेरी खून खटल्याप्रकरणी कुख्यात गुंंड पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप

googlenewsNext
ठळक मुद्देखटल्यातील अन्य बारा जणांची निर्दाेष मुक्ततासंघटित गुन्हेगारीचे एकूण २२ गुन्हे दाखल करण्यात आले

नाशिक : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या शिर्डीतील दुहेरी खून खटल्याप्रकरणी कुख्यात गुंंड पाप्या शेखसह १२ जणांना विशेष मकोका न्यायालयाने गुरुवारी (दि. ३) जन्मठेप आणि एक कोटी ३४ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय अहवाल आणि आरोपी क्रमांक ८ याने दिलेला कबुली जबाब ग्राह्य धरून विशेष मकोका न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी शिक्षा सुनावली. या खटल्यातील अन्य बारा जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली आहे. सन २०११ मध्ये शिर्डीतील प्रवीण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी अपहरण करून अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केल्याप्रकरणी नाशिकच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी सुरू होती. यामध्ये शिर्डीतील कुख्यात गुंड पाप्या शेख यासह त्याच्या २३ साथीदारांविरुद्ध विशेष मकोका न्यायालयात खटला सुरू होता. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दररोज या खटल्याची सुनावणी सुरू होती. या आरोपींविरोधात संघटित गुन्हेगारीचे एकूण २२ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे तपासी यंत्रणेपुढे तपासाचे मोठे आव्हान असताना यंत्रणेने संपूर्ण गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयापुढे सक्षम पुरावे सादर केले होते. तसेच एकूण ४५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या होत्या. विशेष मकोका न्यायालयाने तपासी यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे परिस्थितीजन्य पुरावा, वैद्यकीय अहवाल आणि आरोपी क्रमांक ८ याने दिलेला कबुली जबाब ग्राह्ण धरून गुरुवारी न्यायाधीश शर्मा यांनी अंतिम सुनावणीत खटल्याचा निकाल दिला. त्यानुसार पाप्या शेख याच्यासह बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यामध्ये पाप्या ऊर्फ सलीम ख्वॉजा शेख (३२), विनोद सुभाष जाधव (३१), सागर मोतीराम शिंदे (१९), सुनील ज्ञानदेव लहारे, आबासाहेब बाबासाहेब लांडगे (२६), माउली ऊर्फ ज्ञानेश्वर शिवनाथ गुंजाळ (२२), गनी महेबूब सय्यद (३०), चिंग्या ऊर्फ समीर निजाम पठाण, रहीम मुनावर पठाण (२३), सागर शिवाजी काळे (२०), नीलेश देवीलाल चिकसे (१९) आणि निसार कादीर शेख (२४) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचप्रमाणे मकोका कायद्यानुसार जन्मठेप सुनावलेल्या प्रत्येकी आरोपीस ६ लाख रुपये आणि आयपीसी कायद्यानुसार प्रत्येकी १६ हजार याप्रमाणे एकूण एक कोटी ३४ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या दंडाच्या रकमेपैकी मयताच्या नातेवाइकास १० लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. राजेंद्र किसन गुंजाळ (३३), इरफान अब्दुल गनी पठाण (२०), मुबारक ऊर्फ लड्ड्या ख्वॉजा (४२), वाल्मीक पावलस जगताप (४२), दत्तात्रय बाबुराव कर्पे (३५), भरत पांडुरंग कुरणकर (४९), बिसमिल्ला मर्द पाप्या ऊर्फ सलीम शेख (२५), संदीप श्यामराव काकडे (२४), हिराबाई श्यामराव काकडे (४९), मुन्ना गफूर शेख (२४), राजू शिवाजी काळे (२१), प्रकाश सुरेश अवसरकर (२२) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे सर्व यापूर्वीच जामिनावर मुक्त होते. विशेष मकोका न्यायालयाने १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पिंजऱ्यात उभ्या असलेल्या एकाही आरोपीला या शिक्षेविषयी काहीच वाटले नाही. याउलट पिंजºयातील एका आरोपीने आपल्या वकिलाशी चर्चा करताना त्यांनाच दिलासा दिला. तुम्ही तुमच्या पद्धतीने खूप प्रामाणिक आणि पुरेसे प्रयत्न केले. आता सर्वोच्च न्यायालयात लढण्याची तयारी करा, असे सांगतानाच पैशांची चिंता करू नका, असे सांगत मुलाखतीला आल्यावर अधिक खुलासेवार बोलू, असेही त्या आरोपीने आपल्या वकिलास सांगितले.

Web Title: Twelve murders in Shirdi, 12 people including infamous gangster Papiya Shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा