निफाडमधील बाराजणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:33 PM2020-05-22T20:33:30+5:302020-05-22T23:43:30+5:30
निफाड : तालुक्यातील एकूण १६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी तब्बल १२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे यांनी दिली. बारा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने निफाडकरांना दिलासा मिळाला आहे.
निफाड : तालुक्यातील एकूण १६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी तब्बल १२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता केवळ चार रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती निफाड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे यांनी दिली. बारा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने निफाडकरांना दिलासा मिळाला आहे.
निफाड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या १६ झाल्याने तालुक्यात चिंतेचे व भीतीचे वातावरण पसरले होते. रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाने कसोशीने प्रयत्न करून बारा रुग्ण कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले आहे. एकूण १६ पैकी सर्व १२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या फक्त चार रुग्णांवर उपचार चालू असून, जवळजवळ बारा रुग्ण बरे झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पिंपळगाव बसवंत कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. रोहन मोरे काम बघतात. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन काळे हे तालुक्यातील सर्व नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रमुख म्हणून काम बघतात. निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले हेही या विभागात अथक परिश्रम घेत आहेत.
असे असले तरी निफाड तालुक्यात काही गावात कडकडीत लॉकडाउनचे पालन होणे गरजेचे आहे. या तालुक्यात काही गावात बरेच दुकानदार फक्त विक्रीला महत्त्व देत आहेत. मात्र ग्राहकाला सॅनिटायझर लावणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे या बाबी काटेकोरपणे पाळणे याला महत्त्व दिले जात नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. निफाड तालुक्यात ओझर, मोजे सुकेणे, विष्णुनगर, उगाव या चार गावात मुंबई रिटर्न झालेल्या प्रत्येकी एका नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने परजिल्हा वा तालुक्यातून निफाड तालुक्यात येणाºया नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापुढे प्रत्येक गावात बाहेरील जिल्हा व तालुक्यातून येणाºया नागरिकांवर पोलीसपाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.
---------
कोरोना रूग्णांवर नाशिक, लासलगावी उपचार
तालुक्यात लासलगाव येथील कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार केले जातात. या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम सेंद्रे काम पाहतात, तर पिंपळगाव बसवंत येथील कोविड केअर सेंटर येथे संशयित रुग्णाला दाखल करून त्याची लक्षणे, तपासणी, टेस्टिंग केली जाते. जर सदरचा रु ग्ण पॉझिटिव्ह निघाला तर त्यास नाशिक किंवा लासलगाव येथे उपचार करण्यासाठी पाठवले जाते.