चार चिमुरड्यांसह बारा रुग्णांनी कोरोनावर मिळवला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:05+5:302021-06-04T04:12:05+5:30

सिन्नर: दोन वर्षाच्या सानवीसाठी खास बनवलेला परी फ्रॉक, इतर तीन मुलांसाठी आणलेले नवे कपडे, त्यांच्या हाती दिलेली जादूची झप्पी, ...

Twelve patients with four chimpanzees won the corona | चार चिमुरड्यांसह बारा रुग्णांनी कोरोनावर मिळवला विजय

चार चिमुरड्यांसह बारा रुग्णांनी कोरोनावर मिळवला विजय

Next

सिन्नर: दोन वर्षाच्या सानवीसाठी खास बनवलेला परी फ्रॉक, इतर तीन मुलांसाठी आणलेले नवे कपडे, त्यांच्या हाती दिलेली जादूची झप्पी, फुलांचा वर्षाव करत टाळ्यांच्या गजरात कोरोनावर विजय मिळवलेल्या रुग्णांना काळजी घेण्याच्या सदिच्छांसह घोटेवाडी प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला. १४ दिवस उपचार घेऊन ठणठणीत झालेल्या रुग्णांचे आणि त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांचे प्रफुल्लित चेहरे उपस्थितांत समाधानाची लकेर उमटवणारे ठरले. ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात उपचार घेत चार चिमुरड्यांसह बारा रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला. त्यांना विलगीकरण कक्षातून निरोप देण्यात आला. याप्रसंगी डॉ. छाया राशिनकर, आरोग्य सेविका बिडवई, चंद्रभान घोटेकर, डॉ. साईनाथ घोटेकर, भरत घोटेकर, सरपंच मंजुश्री घोटेकर, सदस्य गोरक्षनाथ घोटेकर, संतोष सरोदे, संतोष घेगडमल, विलास यादव, जयश्री यादव, शोभा बच्छाव, संदीप वाघचौरे, मनीषा यादव, कल्पना लोहोट, किरण यादव, लक्ष्मण कडवे, विलास गुंजाळ, श्रद्धा सूर्यवंशी, सुखदेव वैराळ, वसंत ढमाले, खंडू पठाडे आदी उपस्थित होते.

---------------------

यांनी मिळवला कोरोनावर विजय..

२ वर्षाची सानवी श्रीकांत घेगडमल, ४ वर्षाची श्रावणी सुनील घोटेकर, ९ वर्षाची श्रद्धा रामनाथ घोटेकर, १२ वर्षाचा समाधान रामनाथ घोटेकर या चार चिमुरड्यांसह एचआरसीटी स्कोर १४ असलेला सुनील लक्ष्मण घोटेकर, संतोष बाळू जाधव, मीराबाई रामनाथ घोटेकर, मुक्ताबाई लक्ष्मण घोटेकर, लता सुखदेव वैराळ, श्रीकांत सुखदेव घेगडमल, मनीषा श्रीकांत घेगडमल, सुशिला सुखदेव घेगडमल अशा १२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. याशिवाय गेल्या आठवड्यातच ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

----------------------

खबरदारी महत्त्वाची...

१६ रुग्ण विलगीकरणात उपचार घेऊन ठणठणीत झाले. सध्या विलगीकरण कक्षात एकही रुग्ण नाही, ही गावासाठी सुखद बाब आहे. एका बाधित रुग्णावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गावचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी. -मंजुश्री घोटेकर, सरपंच, घोटेवाडी

-------------------

घोटेवाडी येथील विलगीकरणातून चार चिमुरड्यांसह बारा रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविल्यानंतर टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. (०३ सिन्नर ५)

===Photopath===

030621\03nsk_9_03062021_13.jpg

===Caption===

०३ सिन्नर ५

Web Title: Twelve patients with four chimpanzees won the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.