देवळ्यातील १२ रुग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 04:06 PM2020-07-12T16:06:37+5:302020-07-12T16:06:59+5:30
देवळा : देवळा येथील कोविड सेंटरमध्ये उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या १२ रु ग्णांना रविवारी घरी सोडण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत सापडलेल्या २८ कोरोना बाधित रु ग्णांपैकी एका वृध्द महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून २० रु ग्णांना पूर्णपणे बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले आहे. या दिलासादायक प्रकाराने देवळा तालुक्याची कोरोना मुक्ततेकडे वाटचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे.
उपचार घेत असलेल्या उर्वरित ७ रु ग्णांपैकी दोन रु ग्णांवर देवळा जिल्हा परिषद विद्या निकेतन येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. एक रु ग्ण खासगी रु ग्णालयात उपचार घेत आहे. चार रु ग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. शुक्र वारी देवळा तालुक्यातील २० संशयित व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे तालुकावासियांना दिलासा मिळाला आहे.
देवळा शहरात कोरोनाचे रूग्ण सापडल्यामुळे दि. १३ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून शहरात ४ जुलैनंतर एकही रु ग्ण आढळला नाही.जनता कर्फ्यूमुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश आल्याचे दिसत आहे. सोमवार दि. १३ जुलैपासून शहरातील सर्व दुकानांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास नगरपंचायतीने परवानगी दिलेली आहे. दुकानदारांनी व ग्राहकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, स्वच्छता आदी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.