बाधिताच्या संपर्कातील १२ जण क्वारण्टाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:14 PM2020-07-20T21:14:15+5:302020-07-21T01:57:34+5:30

कसबे सुकेणे : शहराच्या मेनरोड भागात आणखी एक ५५ वर्षीय महिला कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने नागरिकात भीती व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने संबंधिीत महिलेच्या संपर्कातील बारा व्यक्तींना क्वारण्टाईन केले असून शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या आता चार वर गेली आहे.

Twelve people in contact with the victim are quarantined | बाधिताच्या संपर्कातील १२ जण क्वारण्टाईन

बाधिताच्या संपर्कातील १२ जण क्वारण्टाईन

Next

कसबे सुकेणे : शहराच्या मेनरोड भागात आणखी एक ५५ वर्षीय महिला कोरोना बाधित रु ग्ण आढळल्याने नागरिकात भीती व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने संबंधिीत महिलेच्या संपर्कातील बारा व्यक्तींना क्वारण्टाईन केले असून शहरातील कंटेनमेंट झोनची संख्या आता चार वर गेली आहे.
कसबे सुकेणे येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून सोमवारी (दि. २०) शहराच्या मध्य वस्तीत बाजारपेठेत महिला रु ग्ण आढळल्याने नागरिक धास्तावले आहेत. आज सकाळी आरोग्य प्रशासनाने मेनरोड येथे बाधित रु ग्णाच्या घरापासून २५ मीटरचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केले. कसबे सुकेणेत कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंतची रुग्णसंख्या आठ झाली आहे. कसबे सुकेणे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ नये म्हणून ग्रामपालिका आणि आरोग्य यंत्रणा तसेच पोलीस शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कसबे सुकेणे येथे पुन्हा तपासणी धाड सत्र सुरु केले जाणार असून खबरदारीचे उपाययोजना न करणाऱ्या व नियम मोडणाºया नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांच्याकडून लवकरच प्रतिबंधक क्षेत्राची पाहणी करण्यात येणार असून नागरिकांनी कोरोनाविषयक खबरदारी घ्यावी, असे आवाहन धनंजय भंडारे, सुहास भार्गवे , रमेश जाधव यांनी केले. सोमवारी मेनरोड भागात ५० मीटरचे प्रतिबंधक क्षेत्र तयार करतांना बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी विरोध केला. व्यापाºयांच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन नोडल अधिकारी यांनी वरिष्ठांशी बोलून शहरातील मेनरोडचा चौथे प्रतिबंधक क्षेत्र २५ मीटरचे करण्याचे आश्वासन दिले आणि तशी कार्यवाही केली.
------------------
रूग्णांची संख्या झाली आठ
कसबे सुकेणे येथे आतापर्यंत आठ रु ग्ण आढळले आहेत. यातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून सहा रु ग्ण बरे झाले आहेत. नव्याने आढळलेल्या महिला रु ग्णावर उपचार सुरु आहेत . कसबे सुकेणे येथे आता सावतानगर , नागझरी वस्ती , समर्थ नगर , मेनरोड असे एकूण चार कंटेनमेंट झोन झाले असल्याची माहिती कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी दिली.

Web Title: Twelve people in contact with the victim are quarantined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक