दोन महिन्यांत बारा व्यक्तींचा नैसर्गिक आपत्तीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 12:37 AM2017-08-08T00:37:06+5:302017-08-08T00:38:13+5:30
नाशिक : जून महिन्यात मान्सूनपूर्व व त्यानंतर विजेचा कडकडाट, वादळी वाºयामुळे धुवाधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यात बारा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ६९ जनावरेही दगावली आहेत. वादळी वाºयामुळे ३७३ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नाशिक : जून महिन्यात मान्सूनपूर्व व त्यानंतर विजेचा कडकडाट, वादळी वाºयामुळे धुवाधार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यात बारा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ६९ जनावरेही दगावली आहेत. वादळी वाºयामुळे ३७३ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था झाली असली तरी, या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानीलाही सामोरे जावे लागले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने विजेचा कडकडाट करत जोरदार हजेरी लावल्याने त्यात वीज पडून जिल्ह्णात दहा जणांचा बळी गेला. एकट्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात तीन तर सिन्नर व मालेगावी प्रत्येकी दोन व्यक्ती त्यात दगावल्या आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरड कोसळून एक व्यक्ती मरण पावली असून, नाशिक शहरात जून महिन्यात अतिवृष्टीमुळे नाल्याला आलेल्या पुरात पंचवटीतील मोरे मळा येथे राहणारी व्यक्ती मरण पावल्याने नैसर्गिक आपत्तीत एकूण बारा व्यक्ती दगावल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना अथवा वारसांना चार लाख रुपयांप्रमाणे मदत देण्याची तरतूद असल्याने दगावलेल्या बारापैकी अकरा व्यक्तींना ४४ लाख रुपयांचे शासकीय आर्थिक अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. जून व जुलै या दोन महिन्यात विविध कारणांनी जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या आहेत. एकूण ६९ जनावरे वीज पडून पुरात वाहून गेली असून, त्यात दुभती तसेच ओढकाम करणाºया जनावरांचा समावेश आहे. मोठी दुधाळ ३० जनावरे, ६ लहान दुधाळ म्हणजेच शेळ्या, मेंढ्यांचाही त्यात समावेश आहे. लहान-मोठी ओढकाम करणारे बैल, रेडे असे ३३ जनावरांचाही या काळात मृत्यू ओढवला आहे. जनावरांच्या मालकांना एक कोटी ६५ लाख आठ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक आपत्ती कायद्यान्वये नुकसानभरपाईच्या रकमेत दोन वर्षांपूर्वी वाढ केल्याने प्रत्येक जनावराच्या उपयोगीतेवर आर्थिक मदत देण्याची तरतूद या कायद्यात आहे. सुरगाण्यात सर्वाधिक पडझडपावसाळ्यातील वादळी वाºयाने मोठ्या प्रमाणावर घरे, शाळा, गोठ्यांची पडझड झाली आहे. त्यात सर्वाधिक ११६ घरांची पडझड सुरगाणा तालुक्यात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पक्क्या, ३७३ घरांची अंशत व सात झोपड्या, सहा गोठ्यांची पडझड झाली असून, त्यापैकी फक्त १८२ घरांना नुकसान भरपाईपोटी ५२ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.