लक्ष्मीनगरच्या यात्रेत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 02:35 PM2020-02-10T14:35:26+5:302020-02-10T14:35:50+5:30
मांडवड(वार्ताहर): गेल्या आनेक वर्षापासुन चालत आलेल्या लक्ष्मीनगर येथिल पाच दिवसांपासुन सुरु आसलेला खंडेराव यात्रा उत्सव बारा गाड्या ओढुन संपन्न झाला. या वर्षी बारा गाड्या ओढण्याचा व नवरदेवाचा मान चि. बापुसाहेब भिमराव झाल्टे या तरु णास मिळाला होता.
ठळक मुद्देगेल्या पाच दिवसांपासून सुरु आसलेल्या या यात्रेत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावत आनंद घेतला. बापु झाल्टे हे जेजुरी येथुन खंडोबा च दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांचा मुक्काम हा गावातील खंडेराव मंदिरात च होता.
बारा गाड्या ओढण्यापूर्वी महीलांनी नवरदेवाला हळद लावली. सजलेल्या नवरदेवाने बारा गाड्या ओढल्या तेव्हा गावातील व परिसरातील नागरिकांनी यळकोट.यळकोट जय मल्हार या घोषणांनी परिसर भंडारामय करु न दणाणून सोडला होता. त्याच प्रमाणे खंडेराव महाराज यांची मानाची काठी मिरवणुक देखिल मोठ्या उत्साहात पार पडली. गेल्या पाच दिवस भोजनाच्या पंगती व दररोज रात्री नविव गोंधळ व जागरणाच्या कार्यक्र म संपन्न झाले. ाा कार्यक्र माच्या यशस्वी ते साठी पंच कमिटी म्हणून अशोक भगत,भाऊसाहेब उगले ,रमेश गांगुर्डे, देविदास पवार, वाल्मिक लोखंडे आदी पंचानी व ग्रामस्थांनी सहभाग घेतला.