एकविसावे वर्ष : ३८ सायकलस्वार वारकरी शेगाव यात्रेला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 03:01 PM2021-01-04T15:01:01+5:302021-01-04T15:01:45+5:30

ही सायकल यात्रा नाशिकपासून मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगरमार्गे शेगावामधील श्री गजानन महाराज देवस्थानात येत्या ६ जानेवारीला पोहचणार आहे

Twenty-first year: 38 cyclists leave for Warkari Shegaon Yatra | एकविसावे वर्ष : ३८ सायकलस्वार वारकरी शेगाव यात्रेला रवाना

एकविसावे वर्ष : ३८ सायकलस्वार वारकरी शेगाव यात्रेला रवाना

Next
ठळक मुद्देसायकलींवर झळकले पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे फलक

नाशिक: 'गण-गण गणात बोते'चा जयघोष करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सालाबादप्रमाणे शहरातील डीजीपीनगर-२मधून सोमवारी (दि.४) ३८ सायकलस्वार वारकरी शेगाव गजानन महाराज देवस्थान यात्रेला रवाना झाले. नाशिक-शेगाव सायकलवारीचे हे एकविसावे वर्ष आहे.

नाशिक ते शेगाव ४५० किलोमीटर अंतर चार दिवसांत हे सायकलस्वार वारकरी पुर्ण करणार आहे. दररोज शंभर किलोमीटर अंतर कापत विश्रांती घेत पुढच्या प्रवासाला प्रारंभ करणार आहे. ही सायकल यात्रा नाशिकपासून मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगरमार्गे शेगावामधील श्री गजानन महाराज देवस्थानात येत्या ६ जानेवारीला पोहचणार आहे. भक्तिमार्गातून पर्यावरण संवर्धन, पाणीबचत, अन्नाची नासाडी, बेटी बचाव-बेटी पढाओ, वृक्षसंवर्धनाबाबत जागर करत वारकऱ्यांचा प्रवास सुरु राहणार असल्याचे सायकल वारीचे संस्थापक प्रल्हाद (अण्णा) भांड यांनी सांगितले. इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा धडा समाजाला देण्याचा हा प्रयत्न या सायकलवारीद्वारे करत असल्याचे भांड म्हणाले. यावेळी संत निवृत्तीनाथ देवस्थान ट्रस्टचे पालखी प्रमुख पुंडलिकराव थेटे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, अरुण भांड, दगु नाना थेटे आदी उपस्थित होते.

यंदा सायकलवारीत यांचा सहभाग
यावर्षी सायकल वारीत प्रल्हाद भांड यांच्यासह दिलीप देवांग, अविनाश दातीर ,विजय चौधरी, संजय जाधव, अनिल भवर, अक्षय तगरे, राहुल ऊकाडे, भूषण सहाने, राजेंद्र भांड, नारायण सुतार, शरद सरनाईक, अरुण शिंदे, अनिल भावसार, आबासाहेब जाधव, मुकेश कानडे, सुधाकर सोनवणे, पांडुरंग पाटील, राकेश धामणे, राजेंद्र खानकरी, अनुजा खाटेकर, श्रद्धा बूब, सायली अमृतकर, विशाखा सरनाईक आदींसह ३८ सायकलस्वारांचा समावेश आहे.
 

Web Title: Twenty-first year: 38 cyclists leave for Warkari Shegaon Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.