जिल्ह्यात साडेपंचवीस लाख कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:49+5:302021-09-27T04:14:49+5:30
इन्फो लसीकरणाचा वाढता वेग जिल्ह्यात लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांत वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन्ही डोस मिळून २९ लाख ...
इन्फो
लसीकरणाचा वाढता वेग
जिल्ह्यात लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांत वाढला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन्ही डोस मिळून २९ लाख २७ हजार ८९३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यात पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या २१ लाख ४५ हजार २३१ इतकी असून दुसरा डोस ७ लाख ८२ हजार ६६२ नागरिकांनी घेतला आहे. जिल्ह्यात आता सर्वच केंद्रांवर लसींचा व्यवस्थित पुरवठा होताना दिसून येत असून लागणाऱ्या रांगा व होणारी गर्दीही कमी-कमी झालेली आहे.
इन्फो
तीन तालुके अद्याप धोकादायक
जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी सिन्नर, निफाड व येवला या तीन तालुक्यांत अद्यापही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. सिन्नर तालुक्यात आजमितीला २५५, निफाड तालुक्यात १८५, तर येवला तालुक्यात ८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आजअखेर १ हजार २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सुरगाणा तालुक्यात एकही रुग्ण उपचाराखाली नाही.