पंचवीस वर्षे मागे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; माधव भंडारी यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 03:10 PM2020-12-01T15:10:32+5:302020-12-01T15:16:02+5:30
नाशिक- राज्याची महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या काळात सर्व क्षेत्रात पिछेहाट सुरू असून २५ वर्षे महाराष्ट्राला मागे ठेवून नेल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष माधव भंडारी केला. अन्य राज्यात उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप म्हणजेच आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याचे भंडारी म्हणाले.
नाशिक- राज्याची महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या काळात सर्व क्षेत्रात पिछेहाट सुरू असून २५ वर्षे महाराष्ट्राला मागे ठेवून नेल्याचा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी केला. अन्य राज्यात उद्योग पळवून नेल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप म्हणजेच आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याचे भंडारी म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर भंडारी यांनी भाजपच्या वसंत स्मृती कायार्लयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप केला. यावेळी व्यासपीठावर पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, सुनील बागुल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या कृषी विधेयकास शेतकरी विरोधी म्हणायचे आणि राज्यात मात्र याच शेतकऱ्यांचा कृषी उतन्न समितीतील शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार काढून घ्यायचा हा शेतकऱ्यांच्या संदर्भातील दुटप्पीपणा असल्याचा आराेप भंडारी यांनी केला आहे. तसेच केंद्राने कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला. मात्र राज्य सरकारचे नियोजन अपुरे पडल्याने तब्बल ४६ हजार रूग्णांचे बळी गेले आहेत. केंद्राने दिलेल्या निधीचा विनीयोग नक्की कसा केला हे राज्य सरकारने जाहीर करावे असेही भंडारी म्हणाले.