फ्लॅट्सच्या परस्पर विक्रीतून वीस लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:20 AM2018-08-26T00:20:22+5:302018-08-26T00:21:06+5:30
पाथर्डी परिसरातील चार फ्लॅटच्या खरेदीचे व करारनाम्याचे पैसे घेऊन हे फ्लॅट परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विक्री करून दोघा संशयितांनी एकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
नाशिक : पाथर्डी परिसरातील चार फ्लॅटच्या खरेदीचे व करारनाम्याचे पैसे घेऊन हे फ्लॅट परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विक्री करून दोघा संशयितांनी एकाची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित संदीप सुदाम भालके (रा. भालके फार्म, तपोवन) व पंकज रामगीर गोसावी (रा. कृष्णानगर, अंबड) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सातपूर पोलीस ठाण्यात जितेश रमेश वैश्य (रा. सातपूर औद्योगिक वसाहत) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित भालके याने पाथर्डी फाटा परिसरात फ्लॅटबाबत स्कीम सुरू केली होती़ या स्कीममधील फ्लॅट वैश्य यांनी घेतले व संशयित भालके आणि गोसावी यांना रोख व चेकने २० लाख रुपये दिले आहे़ दरम्यान, या दोघा संशयितांनी १ मे २०१५ ते ३० एप्रिल २०१८ या कालावधीत वैश्य यांच्याकडून पैसे घेऊन करारनामा केलेला असताना त्यांना फ्लॅट न देता त्याची परस्पर तिसºया व्यक्तीला विक्री केली़