बारबालांसह सोळा जण ताब्यात :  इगतपुरी रिसॉर्टमध्ये डान्सपार्टी उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:52 AM2018-03-20T01:52:24+5:302018-03-20T01:53:10+5:30

निसर्गरम्य तालुका म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या इगतपुरी परिसरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. नाशिक-मुंबईपासून जवळ असलेल्या इगतपुरीमध्ये कल्याण, भार्इंदरच्या बारबालांना बोलावून एका रिसॉर्टमधील बंगल्याच्या आवारात रंगविलेली डान्स पार्टी पोलिसांनी उधळली. पोलिसांनी सहा बारबालांसह दहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

Twenty six people, including Barbalas, were arrested: Igatpuri resort danced off | बारबालांसह सोळा जण ताब्यात :  इगतपुरी रिसॉर्टमध्ये डान्सपार्टी उधळली

बारबालांसह सोळा जण ताब्यात :  इगतपुरी रिसॉर्टमध्ये डान्सपार्टी उधळली

googlenewsNext

नाशिक : निसर्गरम्य तालुका म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या इगतपुरी परिसरात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. नाशिक-मुंबईपासून जवळ असलेल्या इगतपुरीमध्ये कल्याण, भार्इंदरच्या बारबालांना बोलावून एका रिसॉर्टमधील बंगल्याच्या आवारात रंगविलेली डान्स पार्टी पोलिसांनी उधळली. पोलिसांनी सहा बारबालांसह दहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.  याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात असलेल्या मिस्टीक व्हॅली परिसरातील नऊ क्रमांकाच्या बंगल्याच्या परिसरात रस्त्यावर डीजेचा दणदणाट करून बारबालांचा नाच सुरू होता. नाशिकची स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलिसांनी रात्री सव्वा-बाराच्या सुमारास संयुक्त कारवाई करून या डान्सपार्टीचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या नाशिकमधील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयितांमध्ये एका कथित पत्रकार संघटनेच्या अध्यक्षाचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. या बंगल्यात बारबालांच्या अश्लील नृत्याचा आनंद घेणारे संशयित डॉ. राहुल मगनलाल जैन (३३, रा. बागमार भवन, नाशिक), अनिल लक्ष्मण बर्गे (४२, रा. जुने नाशिक), लक्ष्मण राजेंद्र पवार (३१, पेठरोड नाशिक), प्रकाश पांडुरंग गवळी (३३, पंचवटी), अर्जुन दत्तात्रय कवडे (२३, मखमलाबाद नाशिक), बासू मोहन नाईक (४४, खडकाळी, जुने नाशिक), आकाश राजेंद्र गायकवाड (१९, रा. पाथर्डीफाटा, नाशिक), हर्षद विजयकुमार गोठी (२७, वासननगर, नाशिक), चेतन दत्तात्रय कवरे (३०, मखमलाबाद), काशी अनंतलाल पंडित (३५, शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी मुंबई येथून सहा बारबालांना बोलावून डान्स पार्टी रंगविली होती. याप्रकरणी इगतपुरीचे पोलीस नाईक सचिन देसले यांनी इगतपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा बारबाला व दहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. वाय. मांडवे करीत आहेत. एकूणच इगतपुरी हा परिसर निसर्गरम्य असून, पर्यटनाच्या दृष्टीने हा तालुका अधिक विकसित होत असताना अशा प्रकारे अवैधरीत्या गैरकृत्याचे प्रकार वाढीस लागणे पर्यटनासाठी धोक्याचे ठरणारे असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Twenty six people, including Barbalas, were arrested: Igatpuri resort danced off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.