एटीएम कार्ड बदलून वीस हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 01:56 AM2022-01-01T01:56:01+5:302022-01-01T01:56:33+5:30
दिंडोरी रोडवरील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या युवकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील एटीएम कार्ड ताब्यात घेत त्यातून २० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मुंबई येथे राहणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : दिंडोरी रोडवरील एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या युवकाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील एटीएम कार्ड ताब्यात घेत त्यातून २० हजार रुपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मुंबई येथे राहणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलमोहर नगरला राहणाऱ्या जगदीश गोपाल पवार यांनी या फसवणूकप्रकरणी फिर्याद दिली असून, त्याआधारे पंकज दिनेश शर्मा व अफसर अब्दुल गफारखान या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार दिंडोरी रोडवरील एसबीआय केंद्रात एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आले असता, संशयितांनी पवार यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या कडील एटीएम कार्ड ताब्यात घेत त्यांच्याकडे रुक्साना पठाण या महिलेचे एसबीआय एटीएम कार्ड देत दुसऱ्या संशयित आरोपीने दुसऱ्या एटीएममधील २० हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.