गत सप्ताहात वीस हजार क्विंटलची कांदा आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:52+5:302021-09-27T04:14:52+5:30
इन्फो दरात सातत्याने घसरण उन्हाळ कांद्याला २,३२९ रुपये इतका कमाल बाजारभाव मिळाला आहे. २९ जुलै रोजी उन्हाळ कांद्याला २,०२० ...
इन्फो
दरात सातत्याने घसरण
उन्हाळ कांद्याला २,३२९ रुपये इतका कमाल बाजारभाव मिळाला आहे. २९ जुलै रोजी उन्हाळ कांद्याला २,०२० रुपये भाव मिळाला होता, त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण होत होती. मात्र, पावणेदोन महिन्यानंतर पुन्हा उन्हाळ कांदा चांदवड बाजार समितीत दोन हजार रुपये पार झाला आहे. चांदवड बाजार समितीत योग्य दर व शेतीमाल विक्रीची रक्कम रोख स्वरुपात मिळत असल्याने तालुक्यासह इतर तालुक्यांतील शेतकरी चांदवड येथे शेतमालाच्या विक्रीला प्रथम पसंती देतात. त्याचप्रमाणे मागील महिन्यात टोमॅटो, मिरची यासह इतर भाजीपाला कवडीमोल दराने विक्री करावा लागला होता. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी टोमॅटो, मिरची यासह इतर भाजीपाला काढून टाकला. सद्यस्थितीत आवक घटलेली असल्याने गत सप्ताहात भाजीपाल्याच्या बाजारभावात वाढ झालेली आहे.