जिल्ह्यातील वीस आदिवासी गावे वनसंवर्धनाच्या वाटेवर

By अझहर शेख | Published: July 28, 2019 12:09 AM2019-07-28T00:09:27+5:302019-07-28T00:13:48+5:30

‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे.

 Twenty tribal villages in the district on the road to forestry | जिल्ह्यातील वीस आदिवासी गावे वनसंवर्धनाच्या वाटेवर

जिल्ह्यातील वीस आदिवासी गावे वनसंवर्धनाच्या वाटेवर

Next

नाशिक : ‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. नैसर्गिक ऋतूचक्रही बिघडत आहे. याची जाणी ठेवत वनांचे महत्त्व जिल्ह्यातील वीस आदिवासी गावांना पटले असून, वनसंवर्धनासाठी त्यांनी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. हजारो हेक्टरवर रोपवन विकसित करून उत्तमप्रकारे त्याचे संवर्धन लोकसहभागातून होताना दिसत आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध गावे दरवर्षी संत तुकाराम वनग्राम योजनेत बक्षीसपात्र ठरत आहेत.
नैसर्गिक राखीव वनक्षेत्र किंवा रोपवनातील वृक्षसंपदा असो, त्यांचे संरक्षण व संवर्धन महत्त्वाचे आहे. वने टिकली तर परिसरात पर्जन्यमानाचे प्रमाणही टिकून राहण्यास मदत होते. आदिवासी गावकऱ्यांनाही वनांचे महत्त्व पटले असून, वनविभागाने स्थापन केलेल्या संयुक्त वनव्यवस्थापन समितींच्या माध्यमातून गावकºयांनी एकत्र येत वनजमिनींवर होणारे अतिक्रमण रोखण्यासह वनक्षेत्रात चराई व कुºहाडबंदीचा निर्णय घेतला.
वनविभाग पूर्व, पश्चिम भागातील ननाशी, त्र्यंबकेश्वर, कळवण, सुरगाणा, उंबरठाण, दिंडोरी या वनपरिक्षेत्रातील सुमारे वीस गावांनी नैसर्गिक जंगलाचे संरक्षण करण्याबरोबरच नव्याने वृक्षलागवडीवरही भर दिला आहे. जल मृदसंधारणाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होऊ लागली. त्यामुळे बागायती पिकांचे उत्पादन आदिवासी शेतकºयांना घेणे शक्य होत आहे.
जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे.
वनसंवर्धनाच्या माध्यमातून गाव, पाड्यांचा शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न वनविभाग लोकसहभागातून करत आहे. पूर्व भागातील सुरगाणा ते कळवण वनपरिक्षेत्रातील बहुतांश गावे स्वयंस्फूर्तीने पुढे आली आहे. त्यामुळे भविष्यात पुन्हा या भागात जंगलांची घनता वाढलेली दिसून येईल. त्याचा फायदा गावकºयांनाही निश्चित स्वरूपात होणार आहे.
- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक, नाशिक पूर्व
गाव, पाड्यांनी जंगले राखली त्याचा सर्व फायदा शासनआदेशानुसार त्याच गावांना मिळवून देण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. निंबारपाड्यावर आदिवासींनी जपलेला बांबू वनविभागाने विक्री करून मिळालेला मोबादला संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी खर्च करण्यावर भर दिला जाणार आहे.
- सुजित नेवसे, सहायक वनसंरक्षक
गवळीपाड्यात लोकसहभागातून वनजमिनींवरील अतिक्रमणे काढण्यात आली. साग फुटव्यांचे संरक्षण करून त्याचे जंगलात रूपांतर झाले. ठिकठिकाणी रोपवन करून ते गावकºयांनी सांभाळले. त्यामुळे संत तुकाराम वनग्राम योजनेत गवळीपाडा जिल्ह्यात प्रथम तर राज्यात द्वितीय क्रमांक मिळवू शकला. पश्चिम भागामधील विविध वनपरिक्षेत्रात अशा पद्धतीने लोकसहभागातून वनविकास आणि निसर्ग संवर्धन केले जात आहे.
- रवींद्र भोगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पश्चिम भाग, नाशिक
असे केले निसर्गसंवर्धन
 जंगल राखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार
 दरवर्षी हजारो रोपांची लागवड अन् संवर्धन
 जंगल परिसरात समतल चर खोदून पाणी अडविले.
 वनतळे, बंधारे, दगडी नाले बांधून जलमृदा संधारणाची कामे प्राधान्याने केली.
 जंगलात होणारी घुसखोरी थांबविली.
 चराई व कुºहाडबंदीचा निर्णय एकत्रित घेत अमलात आणला.
या गावांनी घेतली आघाडी
 पूर्व भाग : सुरगाणा वनपरिक्षेत्र : गोंदुणे, देवगाव, निंबारपाडा, त्रिभुवन.
 कनाशी वनपरिक्षेत्र : शेपूपाडा, कोसवन.
 दिंडोरी वनपरिक्षेत्र : भातोडा.
 कळवण वनपरिक्षेत्र : इन्शी.
 चांदवड वनपरिक्षेत्र : कानडगाव
 पश्चिम भाग : ननाशी वनपरिक्षेत्र - गवळीपाडा (महाजे), शृंगारपाडा, चिमणपाडा, झारली, धोंडापाडा
 त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र : काचुर्ली, श्रीघाट, टाके देवगाव, कळमुस्ते, हर्षेवाडी.

Web Title:  Twenty tribal villages in the district on the road to forestry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.