अडीचशे बॅनर्स, २८ होर्डिंग्ज हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:13 AM2019-03-12T01:13:37+5:302019-03-12T01:14:24+5:30
आचारसंहिता लागू होताच महापालिकेच्या वतीने राजकीय फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवारी (दि.११) एकाच दिवसात २५१ पोस्टर बॅनर्स, तर २८ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत.
Next
नाशिक : आचारसंहिता लागू होताच महापालिकेच्या वतीने राजकीय फलक, बॅनर्स, होर्डिंग्ज व झेंडे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, सोमवारी (दि.११) एकाच दिवसात २५१ पोस्टर बॅनर्स, तर २८ होर्डिंग्ज हटविण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १०) देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत बेकायदेशीर पोस्टर्स आणि बॅनर्स काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्या अंतर्गत महपालिकेने सोमवारी (दि.११) सायंकाळपर्यंत २५१ पोस्टर्स व बनर्स, तसेच २८ होर्डिंग्ज, २४४ झेंडे आणि अन्य ८४ याप्रमाणे हटविले आहेत.