पाण्यात अडकलेल्या वीस जणांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 12:05 AM2016-07-12T00:05:40+5:302016-07-12T00:05:59+5:30

आपत्ती व्यवस्थापन : यंत्रणेसह तहसीलदारही उतरले पाण्यात

Twenty-two people released in the water are released | पाण्यात अडकलेल्या वीस जणांची सुटका

पाण्यात अडकलेल्या वीस जणांची सुटका

Next

इगतपुरी : तालुक्यात गेल्या ४८ तासांहून अधिक पाऊस झाल्याने संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच तालुक्याच्या पश्चिम भागातील पिंप्रीसदो गावाजवळीळ तारांगणपाडा या भागात आपत्ती उद्भवली; मात्र तहसीलदार अनिल पुरे व त्यांच्या यंत्रणेने सतर्कता दाखवित वीस जणांची सुटका केली.
इगतपुरी परिसरात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे दारणा, भाम व भावली नदीला पूर आला होता. या पुराने देवळे, दौंडत, सोमज आदी गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. त्याबरोबरच तारांगणपाडा येथे पुराच्या पाण्याचा विसर्ग न झाल्याने पुराचे पाणी अक्षरश: या पाड्यातील नागरीकांच्या घरात शिरले. पाडयातीलच एकाने तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाला संपर्क साधला़ तहसिलदार अनिल पुरे यांनी क्षणाचाही विलंब न करता यंत्रणेला आदेशित करीत तारांगणपाडा गाव गाठले. तहसिलदार अनिल पुरे यांनी स्वत:ही सहभाग घेत पाण्यात उतरु न दोरखंडाच्या सहाय्याने पाण्यात अडकलेल्या वीस जणांची सुटका केली़ या संकटातुन सुटका झालेल्यामध्ये देवराम आगीवले, बुधाबाई आगीवले, राजु आगीवले,प्रकाश आगीवले,आनिल आगीवले,सुनिल आगीवले,लहानू आगीवले, शांताबाई आगीवले, हौसाबाई आगीवले,लक्ष्मण आगीवले, काळाबाई आगीवले, संगीता आगीवले,दाजी आगीवले, भारती आगीवले, वैशाली आगीवले,आना आगीवले निवृत्ती आगीवले,हरी आगीवले यांचा समावेश आहे़ (वार्ताहर)

Web Title: Twenty-two people released in the water are released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.