भेंडाळीत दोन एकर मका उपटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 06:16 PM2019-07-23T18:16:46+5:302019-07-23T18:17:31+5:30
खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे असलेल्या मका पिकावरील लष्करी अळी थांबत नसल्याने वैतागलेल्या भेंडाळी येथील रवींद्र शिंदे या शेतकºयाने आपल्या शेतातील दोन एकर मका अखेर उपटून टाकला.
सायखेडा : खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे असलेल्या मका पिकावरील लष्करी अळी थांबत नसल्याने वैतागलेल्या भेंडाळी येथील रवींद्र शिंदे या शेतकºयाने आपल्या शेतातील दोन एकर मका अखेर उपटून टाकला. त्यामुळे शिंदे यांचा ४० हजार रु पये लागवड आणि खताचा खर्च वाया गेला आहे.
यंदा प्रथमच मका पिकावर लष्करी अळी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. मक्याच्या गाभ्यात अळी पडते. आठ दिवसाला प्रभावी कीटकनाशकाची फवारणी करूनदेखील अळीचा बंदोबस्त होत नाही. शिंदे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात वीस दिवसांपूर्वी मक्याची लागवड केली होती. आठ दिवस झाल्यानंतर पहिल्यांदा फवारणी केली, त्यानंतर चार-चार दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या केल्या. काही पावडरची धुरळणी केली तरी अळी जात नसल्याने त्यांनी अखेर संपूर्ण मका उपटून टाकला.
दोन एकर मक्याची लागवड, जमिनीची मशागत, मजुरी, बियाणे, औषध फवारणी असा सर्व खर्च त्यांना चाळीस हजार रु पये आला होता. सर्व खर्च वाया गेला आहे. एक महिना दुसरे पीक उशिरा होणार त्या पिकाला उभे करण्यास पुन्हा खर्च येणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेती व्यवसाय जुगार बनला आहे. अनेक शेतकरी अळीच्या प्रादुर्भावाने अडचणीत आले आहे. पिके उभी करून खर्च वाया जात आहे.
मका पिकाचा एकरी खर्च
मशागत : पाच हजार रुपये. ४बियाणे : चार हजार रुपये. ४मजुरी : दोन हजार रुपये. ४खते : ९ ते १० हजार रुपये. ४एकूण खर्च : २० ते २१ हजार रुपये.