मेसनखेडे शिवारातील दोन एकर कांदा रोपे गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 04:22 PM2019-11-07T16:22:01+5:302019-11-07T16:22:09+5:30

चांदवड - तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांदे वाहून गेले.

Two acres of onion seedlings in the Masonkheda Shivar were carried away | मेसनखेडे शिवारातील दोन एकर कांदा रोपे गेले वाहून

मेसनखेडे शिवारातील दोन एकर कांदा रोपे गेले वाहून

googlenewsNext

चांदवड - तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांदे वाहून गेले. त्याचबरोबर जमिनीतील पुर्णपणे माती खरडली गेल्याने आत खडकावर आल्याने हे शेतकरी कुंटूब हतबल झाले असून बळीराजा हवालदिल झाला आहे . गेल्या दिड महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे चांदवड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते. परंतु दि. १ नोव्हेबर रोजी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मेसेनखेडे शिवारातील रंजना संजय खताळ या महिलेचे दोन एकर लागवड केलेल्या कांद्यातून पाझर तलावातील पाणी गेल्याने संपूर्ण कांदा पिक शेतातील माती सहीत वाहून गेले आहे. खताळ यांना कांद्याचे शेत तयार करण्यापासून ते लागवडीपर्यत एक लाखाच्यावर खर्च आला आहे. शासनाने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खताळ यांनी केली आहे .

Web Title: Two acres of onion seedlings in the Masonkheda Shivar were carried away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक