बाेरी धरणात सेल्फी काढताना अजंगच्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:37+5:302021-03-25T04:15:37+5:30
अजंग येथील लग्नाचे वऱ्हाड निमशेवडी येथे मित्राच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. लग्न आटोपून गावाकडे परततांना अजंग येथील हर्षल देवीदास ...
अजंग येथील लग्नाचे वऱ्हाड निमशेवडी येथे मित्राच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. लग्न आटोपून गावाकडे परततांना अजंग येथील हर्षल देवीदास जाधव, रितेश देवीदास जाधव व चुलतभाऊ भावेश भगवान जाधव हे बोरी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास हर्षल जाधव (२२) व रितेश जाधव (१८) या दोघांच्या सेल्फी काढताना पाण्यात बुडून मृत्यू झाला; सुदैवाने त्यांचा चुलत भाऊ भावेश भगवान जाधव हा वाचला. दोन्ही चुलत भाऊ बुडाल्याचे पाहून भावेश घटनास्थळीच बेशुद्ध पडला. ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच तेथे गर्दी झाली. ग्रामस्थांनी मृतदेह पाण्यातून काढून नातलगांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरा वडेल येथे दोघांवर अंत्यविधी करण्यात आला. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हर्षल हा इंजिनिअरींगच्या चौथ्या वर्षात तर रितेश बारावी शिकत होता. त्यांचे वडील देविदास जाधव हे येवला येथील महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेत शिक्षक आहेत. एकाचवेळी दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
===Photopath===
240321\24nsk_34_24032021_13.jpg~240321\24nsk_35_24032021_13.jpg
===Caption===
फाेटो फाईल नेम : २४ एमएमएआर ०९ . जेपीजी - रितेश जाधवफाेटो फाईल नेम : २४ एमएमएआर १० . जेपीजी - हर्षल जाधव~फाेटो फाईल नेम : २४ एमएमएआर ०९ . जेपीजी - रितेश जाधवफाेटो फाईल नेम : २४ एमएमएआर १० . जेपीजी - हर्षल जाधव