द्राक्ष उत्पादकांना अडीच कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 04:20 PM2020-01-03T16:20:24+5:302020-01-03T16:21:48+5:30

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी, व चांदवड या चार तालुक्यातील ७० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २ कोटी ४२ लाख ४६ हजार ३०१ रु पयांच्या फसवणूक प्रकरणी तीन व्यापा-यांवर पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Two and a half crore rupees for grape growers | द्राक्ष उत्पादकांना अडीच कोटींचा गंडा

द्राक्ष उत्पादकांना अडीच कोटींचा गंडा

Next

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी, व चांदवड या चार तालुक्यातील ७० द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २ कोटी ४२ लाख ४६ हजार ३०१ रु पयांच्या फसवणूक प्रकरणी तीन व्यापा-यांवर पिंपळगाव बसवंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्सपोर्टच्या मालकांनी व त्यांच्या भागिदारांनी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकºयांची द्राक्ष खरेदी केली. पण त्यांना अद्यापही द्राक्ष मालाचे पैसे न देता पलायन करत कोट्यवधी रु पयांची फसवणूक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगावचे शेतकरी रमेश खैरे व अन्य शेतकºयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, इगतपुरी, व चांदवड तालुक्यातील जवळपास ७० द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी ओझर येथील आदित्य अँग्रो एक्स्पोर्टचे व्यापारी संतोष बबन गवळी रा शिवाजी नगर ओझर, निलेश बाळासाहेब दवांगे, रा खेडगाव, पंकज माधव मोहन रा ओझर यांनी शेतकºयांचा द्राक्षमाल एक्स्पोर्टला पाठवून चार तालुक्यातील ७० शेतकºयांना खोटे धनादेश देत जवळपास २ कोटी, ४२ लाख, ४६ हजार ३०१ रु पयांची फसवणूक करत रक्कम देण्यास टाळाटाळ केली. गेल्या कित्येक दिवसांपासून फरार झाले होते. डिसेंबर महिन्यात व्यापारी निलेश बाळासाहेब दवांगे, रा खेडगाव, व पंकज माधव मोहन रा ओझर आदींची माहिती शेतकºयांना मिळाली. त्यावर व्यापारी निलेश दवांगे यांनी शेतकºयांचे पूर्ण पैसे २४ तारखेपर्यंत देणार असल्याचे हमीपत्र पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनमध्ये शेतकºयांसमोर दिले मात्र हमीपत्र देऊनही व्यापारी निलेश दवांगे पुन्हा फरार झाल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनमध्ये तिघा व्यापाºयांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीाक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश चौधरी करत आहे.
यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकरी रमेश खैरे पिंपळगाव बसवंत,अनिल कोठुळे, विनोद पाटील जउळके वणी, नंदू मते, साकोरे मिग, आनंद गायकवाड, जिव्हाळे, अनिल जाधव सोंनजांब, रोहित जाधव पालखेड, बाळासाहेब गायकवाड पालखेड, राजाभाऊ परदेशी, रमेश कुयटे, सत्यजित भालेराव, भगवंत धुमाळ, बाळासाहेब राजगुरू, आदिंसह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Two and a half crore rupees for grape growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक