लॉकडाऊनमध्ये अडीच लाख वाहने जिल्ह्यातून मार्गस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:26 AM2020-07-06T00:26:11+5:302020-07-06T00:26:28+5:30
लॉकडाऊनच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २९ चेकपोस्टवरून सुमारे अडीच लाख वाहनांनी जिल्हात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात यातील ९० ते ९५ टक्के वाहने ही केवळ जिल्ह्यात प्रविष्ट होऊन पुढील शहरासाठी रवाना झाली आहेत.
नाशिक : लॉकडाऊनच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २९ चेकपोस्टवरून सुमारे अडीच लाख वाहनांनी जिल्हात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. अर्थात यातील ९० ते ९५ टक्के वाहने ही केवळ जिल्ह्यात प्रविष्ट होऊन पुढील शहरासाठी रवाना झाली आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाप्रशासनाने सर्वांत अगोदर जिल्ह्याच्या सीमा सिल करून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची आणि प्रवाशांची नोंद घेण्याचे काम हाती घेतले होते. यासाठी जिल्ह्यातील सीमारेषांवर विविध ठिकाणी २९ चेकपोस्ट उभारण्यात आले होते. चेकपोस्टवरून रवाना होणाºया वाहनांची माहिती संकलित करण्याचे काम चेकपोस्टवर करण्यात आले. त्यानुसार कठोर लॉकडाऊन ते लॉकडाऊन शिथिलतेपर्यंत जिल्ह्यात सुमारे दोन लाख ६५ हजार ३८७ वाहने प्रविष्ट झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात अन्य जिल्ह्यांतील आणि राज्यांमधील अनेक वाहने नाशिक जिल्ह्यातून पुढच्या शहरात गेल्याची नोंद चेकपोस्टवर करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यांतून प्रवासी पास घेऊन आलेल्या वाहनांची संख्या सर्वांत मोठी होती, तर विनापास जिल्ह्यात आलेल्या वाहनांवर रितसर कारवाईदेखील करण्यात आली. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी चेकपोस्टवर वाहनांमधील व्यक्तींची तपासणी करण्यात येऊन त्यांना पुढे मार्गस्थ करण्यात आले.
सहा लाख प्रवाशांची नोंद
लॉकडाऊनच्या शंभर दिवसांच्या कालावधीत बहुतांश वाहने ही केवळ नाशिक जिल्ह्यातून इतर शहरांसाठी रवाना झाली आहेत. मुंबई, पुणे, गुजरात आणि मध्य प्रदेशकडे जाणाºया वाहनांची संख्या अधिक आहे. सुमारे अडीच लाख वाहनांमधून ६ लाख ३१ हजार ६३७ इतकी माणसे या वाहनांतून रवाना झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे.
४लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गत तसेच जिल्हाबाहेर येणाºया जाणाºया वाहनांवर निर्बंध आले असले तरी सुरूवातीच्या काळात चेकपोस्टवरून सर्वाधिक वाहने मार्गस्थ झाली. लॉकडाऊनमध्ये निर्बंध आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पासधारक वाहने जिल्ह्यातून गेली.