बाजारसमितीत अडीच हजार अँटिजन चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:18+5:302021-07-07T04:18:18+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन औषध फवारणी केली जात आहे. तसेच बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन औषध फवारणी केली जात आहे. तसेच बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, हमाल व अन्य घटकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय प्रवेशद्वारावर बाजारसमितीत येणाऱ्या बाजार समिती घटकांची तापमापक यंत्राद्वारे शरीराचे तापमान मोजण्याचे काम केले जात आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार बाजार समितीत दैनंदिन ध्वनिक्षेपकामार्फत सूचना देखील दिल्या जात आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये तोंडावर मास्क लावावा अशा सूचना देऊन जनजागृती करण्याचे काम नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत केले जात असल्याचे पिंगळे यांनी सांगितले. चाचणी दरम्यान संशयित आढळून आलेल्या बाजार समिती घटकांना तत्काळ उपचारार्थ रुग्णाला जाण्याबाबत सूचना केल्या आहेत.