लॉकडाउनमध्ये अडीच हजार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:09 PM2020-04-17T22:09:18+5:302020-04-18T00:26:01+5:30

नाशिक : लॉकडाउनच्या काळात अद्याप एकूण १ हजार ७९३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील विविध भागांतून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांवर विनाकारण भटकणाऱ्या तसेच संचारबंदी, साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन करणा-या एकूण २ हजार ६७५ लोकांविरुद्ध मागील १९ मार्चपासून अद्यापपर्यंत गुन्हे दाखल केले गेले आहेत.

 Two and a half thousand crimes were registered in the lockdown | लॉकडाउनमध्ये अडीच हजार गुन्हे दाखल

लॉकडाउनमध्ये अडीच हजार गुन्हे दाखल

Next

नाशिक : लॉकडाउनच्या काळात अद्याप एकूण १ हजार ७९३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील विविध भागांतून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांवर विनाकारण भटकणाऱ्या तसेच संचारबंदी, साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन करणा-या एकूण २ हजार ६७५ लोकांविरुद्ध मागील १९ मार्चपासून अद्यापपर्यंत गुन्हे दाखल केले गेले आहेत.  ‘कोरोना’चा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह कलम- १४४ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रभावी अंमलबजावणी पोलीस करत आहेत.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्कालीन व अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, काही हौशी नागरिकांकडून जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून दिवस उजाडताच ‘मॉर्निंग वॉक’च्या निमित्ताने घराबाहेर पडले होते. हेच नागरिक आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

Web Title:  Two and a half thousand crimes were registered in the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक