प्रलंबित अहवाल तब्बल अडीच हजारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 01:27 AM2021-12-09T01:27:38+5:302021-12-09T01:28:09+5:30
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.८) एकूण ४६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या गत आठवड्यात वाढून तब्बल २५३२ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि.८) एकूण ४६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या गत आठवड्यात वाढून तब्बल २५३२ वर पोहोचली आहे. त्यात २३४४ अहवाल नाशिक ग्रामीणचे, तर १०९ मालेगाव मनपा, ७९ नाशिक मनपाचे आहेत. जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या ३६९ पर्यंत खाली आली आहे. मात्र प्रलंबित अहवालांची संख्या अडीच हजारांहून अधिक असल्याने त्यातून अनेक रुग्ण बाधित आढळण्याची शक्यता असल्याने कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८० टक्क्यांवर पोहोचले आहे.