कोविड सलग्न मेडिकल्स स्टोअर्स मध्ये अडीच हजार रेम्डिसीविर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:47 PM2020-09-29T23:47:31+5:302020-09-30T01:12:38+5:30

नाशिक: रेम्डिसीविर औषधांचा काळाबाजार आणि जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींनंतर औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवले जात असून रूग्णालये आणि मेडिलकल स्टोअर्सवर औषधांच्या उपलब्ध साठ्यांची माहिती उपलब्ध होत आहे. दरम्यान, कोविड रुग्णालयाशी संलग्न एकूण ५० मेडीकल स्टोअरमध्ये २ हजार ३६८ रेम्डिसीविर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.

Two and a half thousand remedicivir in Kovid affiliated medical stores | कोविड सलग्न मेडिकल्स स्टोअर्स मध्ये अडीच हजार रेम्डिसीविर

कोविड सलग्न मेडिकल्स स्टोअर्स मध्ये अडीच हजार रेम्डिसीविर

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती: काळाबाजार करणाऱ्यांवर लक्ष

नाशिक: रेम्डिसीविर औषधांचा काळाबाजार आणि जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारींनंतर औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवले जात असून रूग्णालये आणि मेडिलकल स्टोअर्सवर औषधांच्या उपलब्ध साठ्यांची माहिती उपलब्ध होत आहे. दरम्यान, कोविड रुग्णालयाशी संलग्न एकूण ५० मेडीकल स्टोअरमध्ये २ हजार ३६८ रेम्डिसीविर उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.

रेम्डिसीविर इंजेक्शनचा तुटवडा व रूग्णांची होणारी पायपीट तसेच त्याच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता यावी या हेतुने जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केल्यानंतर आता प्रत्येक मेडिकल दुकानावर रेम्डिसीविर च्या उपलब्ध साठ्याची व किमतीची माहिती रुग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध होत आहे. पारदर्शकतेसोबतच इंजेक्शनच्या वितरणात सुसुत्रता आली असल्याचेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

जिल्'ातील कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये औषध पुरवठा व आॅक्सिजन च्या बाबतीत कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही असे सांगतांना त्यांनी साठेबाजी करणारे व काळाबाजार करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा पुनरूच्चार केला. जिल्'ात जास्तीत जास्त कोविड रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी कोविड रुग्णालयाशी संलग्न एकूण ५० मेडीकल स्टोअरमध्ये २ हजार ३६८ रेम्डिसीविर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच मंगळवारी (दि.२९) १ हजार ६६६ नवीन इंजेक्शन पुन्हा मिळाले आहेत.

जिल्'ात मोठ्या प्रमाणावर रेम्डिसीविर चा तुटवडा व कोळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांची घटना व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या भरारी पथक प्रत्येक औषधालय, हॉस्पिटल्स ला भेट देत असून तेथे उपलब्ध साठ्याची माहिती, त्याप्रमाणे साठा, झालेली विक्री यांची शहानिशा करीत आहेत. त्यामुळे जिल्'ात रेम्डिसीविर चा पुरेसा साठा रूग्णांना वेळेवर उपलब्ध होत असून तक्रारींचे प्रमाणही कमी झाल्याचा दावा जिल्हाधिकाºयांनी केला आहे.

 

Web Title: Two and a half thousand remedicivir in Kovid affiliated medical stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.