अडीच वर्षांच्या बालिकेने केला नवरा-नवरी किल्ला सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 01:03 AM2021-10-11T01:03:31+5:302021-10-11T01:04:11+5:30

येवला तालुक्यातील मुखेड येथील एका अडीच वर्षांच्या बालिकेने नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने वडिलांसोबत नवरा-नवरी किल्ला सर केला.

A two and a half year old girl built Navra-Navri fort Sir | अडीच वर्षांच्या बालिकेने केला नवरा-नवरी किल्ला सर

अडीच वर्षांच्या बालिकेने केला नवरा-नवरी किल्ला सर

Next

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील मुखेड येथील एका अडीच वर्षांच्या बालिकेने नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने वडिलांसोबत नवरा-नवरी किल्ला सर केला.

शनिवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी नवरात्री उत्सवानिमित्त मुखषड येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या वृंदा महेश जाधव या अडीच वर्षांच्या मुलीने तिच्या वडिलांसोबत नवरा-नवरी किल्ला, पहिने, त्र्यंबकेश्वर, सर करून सर्व नवदुर्गांना वंदन केले. नवरा-नवरी किल्ल्यावरील २६० फूट उंच सुळके सर करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु अचानक आलेला जोराचा पाऊस आणि काही तांत्रिक कारणांमुळे मोहीम पुढे ढकलण्यात आली; परंतु किल्ल्यापर्यंतचा प्रवाससुद्धा अतिशय खडतर आणि जोखीमपूर्ण होता. वाटेत लागणारे ओढे, काटेरी झुडपे, खोल दरी, ऊन-पाऊस, जंगली प्राणी या सर्व आव्हानांना वडिलांसमवेत पार करत वृंदा किल्ल्यापर्यंत पोहोचली.

यावेळी वृंदाने नवनवीन संकल्प केले असून मी रोज अभ्यास करीन, न चुकवता शाळेत जाईन, मोबाइलवर गेम खेळणार नाही. तिच्या या धाडसाबद्दल कौतुक केले जात आहे.

Web Title: A two and a half year old girl built Navra-Navri fort Sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.