पिंपळगाव खांबमध्ये अडीच वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 01:33 PM2020-05-13T13:33:03+5:302020-05-13T13:39:10+5:30

शुक्रवारी पिंपळगाव खांब भागातील जाधव वस्तीलगतच्या मळे भागात हा बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. ही बाब येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली.

Two and a half year old leopard caged in Pimpalgaon pillar | पिंपळगाव खांबमध्ये अडीच वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

पिंपळगाव खांबमध्ये अडीच वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

Next
ठळक मुद्देबिबट्या अत्यंत सुदृढ वनविभागाच्या रोपवाटिकेत दमदार पाहुणचार

नाशिक : येथील शहराजवळच्या खेड्यांपैकी एक असलेल्या पिंपळगाव खांब या गावातील एका मळ्यामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बुधवारी (दि.१३) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अडीच वर्षाचा बिबट्या अडकला. बिबट्याच्या डरकाळ्यांच्या आवाजाने शेतकरी जागे झाले. त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाला कळविली. माहिती मिळताच वनविभागाचे पथक रेस्क्यू व्हॅनसह पिंपळगाव खांब येथे दाखल झाले. रात्री दोन वाजेच्या सुमारास पिंजरा वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅनमधून तत्काळ वनविभागाच्या गोवर्धन शिवारातील रोपवाटिकेत हलविण्यात आला.
याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, शुक्रवारी पिंपळगाव खांब भागातील जाधव वस्तीलगतच्या मळे भागात हा बिबट्या मुक्तपणे संचार करताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. ही बाब येथील शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर याठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली होती. शनिवारी तत्काळ वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी वनरक्षकांसमवेत पाहणी करून येथील मळे भागात पिंजरा तैनात केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या पिंज-यात बिबट्या अडकला. याबाबतची माहिती मिळताच गोसावी यांनी रात्री वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅनचालक प्रवीण राठोड, अशोक खानझोडे यांना तत्काळ पाचारण केले. गावकºयांच्या मदतीने त्यांनी पिंजरा वाहनात टाकून तत्काळ हलविला. उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या आदेशान्वये बुधवारी रात्री उशिरा बिबट्याला शहरापासून लांब अंतरावर नैसर्गिक अधिवासात मुक्त केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, बिबट्या अत्यंत सुदृढ असून त्याने सकाळी वनविभागाच्या रोपवाटिकेत दमदार पाहुणचारदेखील घेतल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Two and a half year old leopard caged in Pimpalgaon pillar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.